Iran-Israel War: मिसाईल, बाँम्बवर्षाव थांबत नसतानाच इराणनं आणखी एका मोसादच्या हेराला पकडून सुळावर चढवलं!
Iran-Israel War: दुसरीकडे, हेरगिरीच्या संशयावरून इराणने डझनभर लोकांना अटक केली आहे. इस्रायली हल्ल्यांना सुरुवात झाल्यापासून, राजधानीत 28 लोकांना अटक करण्यात आली आहे.

Iran-Israel War: अमेरिकेने इराणच्या अणु तळांवर हल्ला करून युद्धाला एका नवीन दिशेने वळवले आहे. इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेले युद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीये आणि आता अमेरिकाही त्यात शिरली आहे. दरम्यान, इराणने इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली इराणने मोहम्मद अमीन महदवी नावाच्या व्यक्तीला फाशी दिली. इस्रायलवरील हल्ल्यानंतर इराणने अलीकडेच दोन जणांना अटक केली. ते मोसादसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप होता. इराणने त्यांना फाशी दिली आणि आता मोहम्मद अमीन महदवी नावाच्या व्यक्तीला फाशीची शिक्षा दिली. अमेरिका देखील इराण-इस्रायल युद्धात सामील झाली आहे.
#BREAKING
— Tehran Times (@TehranTimes79) June 23, 2025
Mohammad Amin Mahdavi Shayesteh was executed this morning for the crime of intelligence cooperation in favor of the Zionist regime. pic.twitter.com/TYb1FemaTv
हेरगिरीच्या संशयावरून इराणने डझनभर लोकांना अटक केली
दुसरीकडे, हेरगिरीच्या संशयावरून इराणने डझनभर लोकांना अटक केली आहे. इस्रायली हल्ल्यांना सुरुवात झाल्यापासून, राजधानीत 28 लोकांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्यावर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे, तर सोमवारी, दोन वर्षांपूर्वी या आरोपाखाली अटक केलेल्या एका व्यक्तीला फाशी देण्यात आली. इस्रायलच्या हल्ल्यापूर्वी मोसादच्या हेरांनी इराणमध्ये शस्त्रे तस्करी केली आणि त्यांचा वापर देशाला आतून लक्ष्य करण्यासाठी केला या खुलाशामुळे इराण अस्वस्थ आहे.
तेव्हापासून इराणी गुप्तचर मंत्रालय जनतेला संशयास्पद हालचालींची तक्रार करण्यास सांगत आहे आणि हेरांना कसे शोधायचे याबद्दल मार्गदर्शन जारी करत आहे. मंत्रालयाच्या एका निवेदनात लोकांना मास्क किंवा गॉगल घालून, पिकअप ट्रक चालवून आणि मोठ्या बॅगा घेऊन किंवा लष्करी, औद्योगिक किंवा निवासी भागात चित्रीकरण करणाऱ्या अनोळखी व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























