एक्स्प्लोर
बिकीनीवरील फोटो पोस्ट, म्यानमारमधील डॉक्टरचा वैद्यकीय परवाना रद्द
28 वर्षीय नांग यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन बिकीनी, स्वीमसूट, अंतर्वस्त्रातील अनेक फोटो पोस्ट केले होते. ताकीद देऊनही हा प्रकार न थांबवल्याने त्यांचं मेडिकल लायसन्स रद्द करण्यात आलं.
मुंबई : बिकीनीवरील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे म्यानमारमधील मॉडेल आणि डॉक्टर अडचणीत आली आहे. वैद्यकीय परिषदेने महिलेच्या डॉक्टरकीचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलेने या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
नांग मी सान यांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्याचा निर्णय म्यानमारमधील मेडिकल कौन्सिलने घेतला आहेत. तीन जून रोजी नांग यांना पत्र लिहून याविषयी कळवण्यात आलं. अयोग्य पद्धतीची वेशभूषा केल्याचा ठपका त्यांच्याविरोधात ठेवण्यात आला आहे.
28 वर्षीय नांग यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन बिकीनी, स्वीमसूट, अंतर्वस्त्रातील अनेक फोटो पोस्ट केले आहेत. चार वर्षांपूर्वी त्यांनी जनरल फिजीशियन म्हणून प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. मात्र मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी त्यांनी प्रॅक्टिस थांबवली.
अविवाहित सलमान खानच्या आजवरच्या गर्लफ्रेंड्स
बर्मिज संस्कृतीला अशोभनीय वेशभूषेतील फोटो पोस्ट न करण्याचा इशारा मी सान यांना जानेवारी महिन्यात देण्यात आला होता. तसं आश्वासन देऊनही त्यांनी फोटो पोस्ट करणं सुरुच ठेवल्यामुळे ही कारवाई केल्याचं मेडिकल कौन्सिलने म्हटलं आहे.
'मी रुग्णांना भेटताना कधी सेक्सी कपडे घातले का? कधीच नाही. त्यामुळे या निर्णयामुळे मी चकित आणि निराश झाले आहे. डॉक्टर होण्यासाठी माझे दीर्घकालीन प्रयत्न होते' असं मी सान यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
क्रीडा
क्राईम
Advertisement