एक्स्प्लोर
H20 म्हणजे काय? मिस वर्ल्ड स्पर्धक अडखळली, नेटिझन खळखळले
'H20 ही कशाची रासायनिक संज्ञा आहे?' या प्रश्नाचं उत्तर मिस वर्ल्ड बांगलादेशच्या स्पर्धकाला न आल्यामुळे ती सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे

मुंबई : सोशल मीडियावर कोणता व्हिडिओ कधी व्हायरल होईल, याचा अंदाज बांधणं खरंच कठीण आहे. 'मिस वर्ल्ड बांग्लादेश' या ब्यूटी काँटेस्टच्या स्पर्धकाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. निमित्त ठरलं ते 'H20 ही कशाची रासायनिक संज्ञा आहे?' या प्रश्नाचं तिला न आलेलं उत्तर. शाळेत रसायनशास्त्राच्या तासाला कठीण रासायनिक संज्ञा पाठ करताना अनेकांच्या नाकी नऊ यायचे. मात्र H20 हा पाण्याचा फॉर्म्युला तुलनेने सोपा. सहसा कोणी विसरणार नाही, असा मानला जातो. मात्र 'मिस वर्ल्ड बांग्लादेश' या ब्यूटी काँटेस्टमध्ये प्रश्नोत्तराच्या फेरीत सौंदर्यवती या प्रश्नाला अडखळली. परीक्षकाने प्रश्न पुन्हा विचारला आणि ती प्रश्न घोळवत राहिली, काहीशी हसली. परीक्षक अवाक झाले आणि त्यांनी प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलं. यावर तिने सारवासारव करण्याचा प्रयत्नही केला. ढाक्यातील धानमोंडीमध्ये याच नावाचं रेस्टॉरंट असल्यामुळे मी गोंधळले, असं तिने बंगालीत सांगितलं. काही वेळातच तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. बहुतांश नेटिझन्सनी तिची खिल्ली उडवण्यात धन्यता मानली. कोणी तिच्यात आत्मविश्वास नसल्यावर बोट ठेवलं, तर कोणी ती घाबरली असेल, अशा कठीण प्रसंगी कोणीही गांगरतं, असं म्हणत तिची बाजू सावरुनही धरली. पण सोशल मीडियावर चर्चा झाली हे निश्चित.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग























