META : मेटाचा महत्वपूर्ण निर्णय, इंजिनियरच्या भरतीत होणार मोठी कपात, आर्थिक मंदीचा फटका
मेटानं (Meta) यावर्षी 10 हजार नवीन इंजिनियरची भरती करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, आता मेटानं आता आपला निर्णय बदलला आहे.
META : सोशल मीडिया साईट फेसबुकची मूळ कंपनी मेटानं (Meta) यावर्षी 10 हजार नवीन इंजिनियरची भरती करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, आता मेटानं आता आपला निर्णय बदलला आहे. मेटाने या वर्षी नोकरभरती मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मेटानं आता सहा ते सात हजार इंजिनियर कमी भरण्याचे निश्चित केले आहे. म्हणजे 30 टक्के इंजिनियर कमी घेण्याचा निर्णय घेतला आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी याबाबतची माहिती दिली. तसेच कंपनी काही पदे रिक्त ठेवत आहे. सध्या सुरु असलेल्या आर्थिक मंदीमुळे इंजिनियरची भरती कमी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देखील झुकेरबर्ग यांनी दिली.
आर्थिक मंदीचा परिणाम
रशिया-युक्रेन युद्ध, डेटा गोपनीयतेतील बदल आणि उद्योगात सुर असलेली मंदी यामुळे आमच्या व्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे. फेसबुकचे तिमाही निकालही अपेक्षेपेक्षा कमी होते. त्यामुळे खर्च कमी करण्याला प्राधान्य देत सध्या नवीन नोकरभरती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातील आपण 10 हजार नवीन इंजिनियरची भरती करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सध्या मंदीची स्थिती आहे. याचा फटका सर्वच क्षेत्राला बसत आहे. त्यामुळं 30 टक्के इंजिनियरची भरती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, मेटाने गेल्या महिन्यातच भरती न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, याबातची सविस्तर माहितीसह आकडेवारी दिली नव्हती.
नियुक्ती कमी करण्याच्या निर्णयासह कंपनी काही पदे रिक्त ठेवणार आहे. असल्याचंही मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितलं. तसेच जे कर्मचारी कामाचं आपलं लक्ष्य पूर्ण करत नाहीत त्यांनाही कमी करण्याच्या संदर्भात व्यवस्थापनावर दबाव असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळं तुमच्यापैकी काही जण ठरवतील की ही जागा तुमच्यासाठी आहे की नाही, असेही ते म्हणाले. सध्याचा काळ कठीण आहे. या प्रतिकूल परिस्थितीतून आपण पुढे जात आहोत. सध्या मंदीची स्थिती असल्यामुळं परिणाम होत आहे. त्यामुळं इंजिनियरच्या भरतीत कपात करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कंपनीचे मुख्य उत्पादन अधिकारी ख्रिस कॉक्स यांनी दिली. आम्ही सध्या अनेक आव्हानांचा सामना करत आहोत. त्यामुळं आमच्याकडं असलेल्या संधींबद्दल सार्वजनिकपणे सांगणे हा मेमोचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
- Whatsapp New Feature : व्हॉट्स-अॅपचं रिअॅक्शन फिचर लाँच; मार्क झुकरबर्गकडून पोस्ट शेअर
- Mumbai : डिजिटल साक्षरता आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी मेटाची महाराष्ट्र सायबरबरोबर भागीदारी