एक्स्प्लोर
मोदी भेटीदरम्यान मेलानिया यांनी परिधान केलेल्या ड्रेसची किंमत तब्बल...
वॉशिंग्टन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका आणि जानेवारी राष्ट्रपतीपदाची शपथ घेणारे डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली भेट अनेक अर्थाने महत्त्वाची होती. पण सोशल मीडियावर मोदी-ट्रम्प यांच्या भेटीसह अमेरिकेची फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्या ड्रेसचीही जोरदार चर्चा होती.
व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह पत्नी मेलानिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं. यावेळी मेलानिया यांनी पिवळ्या रंगाचा बेल्टेड फ्लोरल प्रिंट गाऊन परिधान केला होता. या गाऊनची किंमत सुमारे दीड लाख असल्याचं म्हटलं जात आहे.
https://twitter.com/KateBennett_DC/status/879425551160799232
मेलानिया यांच्या कपडे, हास्य आणि त्यांच्या सौदर्यावर ट्विटराईट्सनी अनेक ट्वीट केले. कोणी मेलानिया यांच्या सौदर्याचं कौतुक केलं, तर काही त्यांच्या हास्याचं आणि काहींनी पिवळ्या गाऊनचे गोडवे गायले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानांमुळे मेलानिया यांच्या अनेक फॅशन डिझायनर्सनी, राष्ट्रपतीपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी ड्रेस डिझाईन करण्यास नकार दिला होता.
https://twitter.com/GotWesties/status/879473310429585408
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
क्रिकेट
Advertisement