एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'फर्स्ट लेडी' बनण्यावरुन डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन पत्नी भिडल्या
68 वर्षीय इव्हाना ट्रम्प व्यवसायाने मॉडेल आणि बिझनेसवुमन आहेत. 1977 मध्ये त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी लग्न केलं होतं. परंतु त्यांचा संसार 1992 मध्ये मोडला.
वॉशिंग्टन : जगभरात मेलानिया ट्रम्प अमेरिकेच्या फर्स्ट लेडी म्हणून ओळखल्या जातात. पण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नीच्या दाव्यानुसार त्याच फर्स्ट लेडी आहेत. मात्र ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नी अशी विधानं करुन केवळ लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा मेलानिया यांनी केला आहे.
68 वर्षीय इव्हाना ट्रम्प व्यवसायाने मॉडेल आणि बिझनेसवुमन आहेत. 1977 मध्ये त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी लग्न केलं होतं. परंतु त्यांचा संसार 1992 मध्ये मोडला.
इव्हाना एका टेलिव्हजन शोमध्ये स्वत:च्या आयुष्यावर लिहिलेल्या 'रेजिंग ट्रम्प' या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी गंमतीत म्हटलं की, "माझ्याकडे व्हाईट हाऊसचा डायरेक्ट नंबर आहे, पण त्यांन कॉल करावा, असं मला खरंच वाटत नाही, कारण तिथे मेलानिया आहे. मेलानियाला वाईट वाटेल असं मला काहीही करायचं नाही. कारण ट्रम्पची पहिली पत्नी तर मीच आहे."
मात्र ट्रम्प यांच्या तिसऱ्या पत्नी आणि अमेरिकेच्या विद्यमान फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांना ही थट्टा आवडली नाही. मेलानिया यांच्या कार्यालयाने परिपत्रक जारी करुन म्हटलं आहे की, "मेलानिया यांनाच अमेरिकेच्या फर्स्ट लेडीचा दर्जा मिळाला आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नीच्या विधानात काहीही तथ्य नाही. दुर्दैवाने हे विधान फक्त लोकांचं लक्ष वेधून घेण्याच्या उद्देशाने केलं आहे."
इव्हान्का ट्रम्पची आई इव्हाना ट्रम्प यांनी आपल्या पुस्तकात डोनाल्ड ट्रम्प यांच्या तीन मुलांच्या पालनपोषणाबाबत सांगितलं आहे. "डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत 14 दिवसात एकदा बोलते," असंही इव्हाना म्हणाल्या.
ट्रम्प यांच्याकडून घटस्फोट घेताना इव्हानाने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. मात्र "गुन्ह्याच्या उद्देशाने हा आरोप केला नाही," असं स्पष्टीकरण नंतर त्यांनी दिलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement