एक्स्प्लोर
जेव्हा 20 वर्षांपूर्वी पार्किंगमध्ये 'विसरलेली' कार सापडते...
जर्मनीतल्या फ्रँकफर्ट शहरात 1997 मध्ये एका व्यक्तीची कार हरवली. त्यानंतर त्याने कार चोरी झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवली.

फ्रँकफर्ट : तुम्ही कधी कार आणल्याचं विसरुन थेट घरी गेला आहात का? असं झालं असेल, तर आपण कार नेली होती, हे तुम्हाला तासाभराने आठवेल, फार फार तर दुसऱ्या दिवशी. मात्र जर्मनीतल्या एका इसमाला अशाचप्रकारे 'विसरलेली' कार तब्बल 20 वर्षांनी सापडली आहे. जर्मनीतल्या फ्रँकफर्ट शहरात 1997 मध्ये एका व्यक्तीची कार हरवली. त्यानंतर त्याने कार चोरी झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवली. मात्र त्यानंतर समोर आलेला प्रकार ऐकून तुम्ही पोट धरुन हसाल. काही दिवसांपूर्वी त्याला 20 वर्षांपूर्वी गेलेली कार सापडली. कार सापडणं निश्चितच आनंददायी नव्हतं. कारण गाडीचं मॉडेल जुनं झालं होतं. तिचा पेंट उडाला होता आणि गंजही चढला होता. मात्र खरी गंमत तर पुढे आहे. कार सापडल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, की गाडी चोरीला गेली नव्हती, तर तो पार्किंगमध्ये विसरला होता. कारमालक आता 76 वर्षांचा झाला आहे. त्याची कारही आता 'बेकार' झाली आहे. त्यामुळे ती गाडी आता भंगारात जाईल. मात्र 20 वर्षांपूर्वी गाडी पार्क केली होती, हे लक्षात ठेवलं असतं, तर ही वेळ आली नसती.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
पुणे
राजकारण






















