धक्कादायक! लंडनमध्ये मोठी विमान दुर्घटना, उड्डानानंतर काही क्षणातच विमान कोसळलं, किती होते प्रवासी?
आज (13 जुलै 2025) लंडनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लंडनच्या साउथेंड विमानतळावर एक विमान कोसळल्याची घटना घडनी आहे.

London Plane Crash News : आज (13 जुलै 2025) लंडनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लंडनच्या साउथेंड विमानतळावर एक विमान कोसळल्याची घटना घडनी आहे. धावपट्टीवरुन उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच हे विमान कोसळले आहे. विमानतळावर विमान कोसळल्यानंतर आगीचे मोठे लोळ दिसत होते.
अपघातग्रस्त विमान बीच बी 200 सुपरकिंग एअर होते. जे लंडनच्या साउथेंड विमानतळावरून नेदरलँड्समधील लेलीस्टॅडला उड्डाण करणार होते. या विमानाचा अंदाजे उड्डाण वेळ दुपारी 3.45 वाजता होता. अपघातग्रस्त बीच बी 200 सुपरकिंग एअर हे ट्विन-इंजिन टर्बोप्रॉप विमान आहे. ते सुमारे 12 हवाई प्रवाशांना वाहून नेण्यास सक्षम आहे. मात्र अपघाताच्या वेळी विमानात किती लोक होते हे अद्याप निश्चित झालेले नाही.
अपघातानंतर बचावकार्य सुरु
अपघाताची माहिती मिळताच एसेक्स पोलिस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका सेवा घटनास्थळी पोहोचल्या आहेत. त्यांनी बचावकार्य सुरू केले. विमानात किती लोक होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु स्थानिक प्रशासन आणि विमान वाहतूक प्राधिकरणाकडून मृतांची संख्या निश्चित केली जात आहे.
प्रशासनानं नेमकी काय दिली माहिती?
साउथेंड वेस्ट आणि लेह खासदार डेव्हिड बर्टन-सॅम्पसन यांनी या विमान अपघाताबाबत माहिती दिली आहे. साउथेंड विमानतळावर झालेल्या विमान अपघाताची मला माहिती आहे. कृपया त्या ठिकाणापासून दूर राहा आणि सर्व आपत्कालीन सेवांना त्यांचे काम करू द्या. अपघातात बाधित झालेल्या सर्वांसोबत माझ्या संवेदना आहेत. आम्ही घटनास्थळी असलेल्या सर्व आपत्कालीन सेवांशी जवळून काम करत आहोत आणि ही प्रक्रिया काही तासांपर्यंत सुरू राहील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. बचाव कार्य सुरु असताना कृपया लोकांना परिसर येणे टाळावे. खबरदारी म्हणून, जवळील रोचफोर्ड हंड्रेड गोल्फ क्लब आणि वेस्टक्लिफ रग्बी क्लबला रिकामे करण्यात आले आहे.
नेमकं अपघाताचे कारण काय? तपास सुरु
Tragedy In London: A Beech B200 Super King aircraft crashed shortly before 4pm during takeoff at just crashed at London Southend Airport, causing an enormous fireball! This is a developing story. There is no details yet on casualties or how many were aboard. pic.twitter.com/Dvpd5F5acG
— John Cremeans (@JohnCremeansX) July 13, 2025
सध्या अपघाताचे कारण कळू शकलेले नाही, परंतु प्राथमिक अंदाजानुसार, हा तांत्रिक बिघाड किंवा इंजिनमध्ये बिघाड असू शकतो. विमानतळ अधिकाऱ्यांनी सध्या धावपट्टी बंद केली आहे आणि सर्व उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत आणि चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि विमानतळाच्या वेबसाइटवर दिल्या जाणाऱ्या अपडेट्सवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एका प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने सांगितले की, आम्हाला मोठा आवाज ऐकू आला आणि विमानाला आग लागल्याचे दिसले. त्यानंतर सर्वत्र ओरड सुरू झाली.
महत्वाच्या बातम्या:























