एक्स्प्लोर

लंडन : दहशतवादी हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू, 40 जखमी, हल्लेखोराचाही खात्मा

लंडन : इंग्लंडच्या संसदेबाहेर बुधवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलिसासह चार जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. तर हल्लेखोराचाही खात्मा करण्यात आला आहे. संसदेबाहेर काय झालं? लंडनमध्ये 22 मार्चला दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी एका हल्लेखोराने संसदेजवळ टेम्स नदीवरील वेस्टमिन्स्टर ब्रीजवर कार अतिशय वेगाने आणली. यामुळे दोघांचा चिरडून मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले. यानंतर ही कार संसदबाहेरील रेलिंगला धडकली. हल्लेखोर कोण होता? केवळ एक हल्लेखोर होता. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही, असं इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी सांगितलं. संसदेबाहेर झालेल्या हल्ल्यामागे कट्टरतावादी इस्लामिक संघटना असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. हातात चाकू घेऊन हल्लेखोर कारमधून बाहेर आला आणि संसद परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला थांबवलं. मात्र त्याने एका पोलिसाला चाकून भोसकलं, ज्यात त्याचा मृत्यू झाला. यावेळी पोलिसाकडे कोणतंही शस्त्र नव्हतं. यानंतर शस्त्रधारी पोलिसांनी हल्लेखोरावर गोळ्या झाडल्या. london-attack-2 मृत आणि जखमींची माहिती आतापर्यंत केवळ मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसाचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. 48 वर्षीय पोलिस कॉन्स्टेबल कीथ पामर 15 वर्षांपासून पोलिस सेवेत होते. जखमींमध्ये आणखी तीन पोलिसांचा समावेश आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. वेस्टमिन्स्टर ब्रीजवर जखमी झालेल्या लोकांमध्ये दक्षिण कोरियाच्या पाच पर्यटक आणि रोमानियाच्या दोन नागरिकांचा समावेश आहे. लँकाशरच्या एका विद्यापीठातील चार विद्यार्थीही जखमी झाले आहेत. स्कूल ट्रिपसाठी लंडनमध्ये आलेले फान्सची तीन मुलंही जखमी झाले आहेत. गंभीर जखमी असलेल्या एका महिलेला टेम्स नदीतून वाचवण्यात आलं आहे. पुलावरुन ती नदीत कशी कोसळली हे अजून स्पष्ट झालं नाही. तर एका फोटोग्राफरने सांगितलं की, त्याने एका व्यक्तीला पुलावरुन खाली फुटपाथवर पडताना पाहिलं. london-attack-3 लंडनमध्ये सुरक्षा व्यवस्था काय? हल्ला झाला त्यावेळी संसदेचं कामकाज सुरु होतं. त्यानंतर ते स्थगित करण्यात आलं. राजकीय नेते, पत्रकार तसंच इतरांना जवळपास पाच तास संसदेतून बाहेर जाऊ दिलं नाही. संसदेपासून जवळच्या वेस्टमिन्स्टर एबे चर्चमधून शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. गुरुवारी म्हणजे आज संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज नियमित वेळेत सुरु होईल. येत्या काळात लंडनच्या रस्त्यावर शस्त्रधारी आणि विनशस्त्रधारी पोलिसांची गस्त वाढवण्यात येईल, असं लंडनच्या महापौरांनी सांगितलं. दरम्यान, ब्रिटनमध्ये धोक्याची शक्यता लक्षात घेऊन अती गंभीर परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. याचा अर्थ तिथे हल्ला होण्याची शक्यता सर्वाधिक आहे.

महत्त्वाच्या बातम्या

गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Embed widget