Britain PM Election Result: लिझ ट्रस ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान, भारतीय वंशाचे ऋषी सुनक पराभूत
Britain PM Election Result: ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची निवडणूक लिझ ट्रस यांनी जिंकली आहे. त्यांनी भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनक यांचा पराभव केला आहे.
Liz Truss New UK: ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची निवडणूक लिझ ट्रस यांनी जिंकली आहे. त्यांनी भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनक यांचा पराभव केला आहे. लिझ ट्रस मंगळवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. लिझ ट्रस यांना 81,326 आणि ऋषी सुनक यांना 60,399 मते मिळाली. थेरेसा मे आणि मार्गारेट थॅचर यांच्यानंतर लिझ ट्रस ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत. पंतप्रधान निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी संपले. निवडणूक निकालापूर्वी आलेल्या मतदानपूर्व सर्वेक्षणात ऋषी सुनक हे लिझ ट्रस यांच्या मागे असल्याचे सांगण्यात आले होते.
निवडणूक जिंकल्यानंतर लिझ ट्रस म्हणाल्या की, त्या एक नवीन योजना मांडणार आहेत. लिझ ट्रस यांनी दावा केला की, कोरोना महामारीनंतर कर कमी करण्यासाठी आणि ब्रिटिश अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी त्या एक योजना घेऊन येत आहे. त्या म्हणाली की, त्या ऊर्जा संकट आणि NHS वर काम करेल. ट्रस म्हणल्या की, "आम्ही सर्वजण आपल्या देशासाठी काम करू .'' तत्पूर्वी ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान पदासाठी जुलैमध्ये निवडणूक सुरू झाली. बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर जवळपास दोन महिन्यांपासून ही निवड प्रक्रिया सुरु होती. अखेर ब्रिटनला नवीन पंतप्रधान मिळाला आहे.
सरकारला सहकार्य करणार : ऋषी सुनक
निवडणुकीच्या निकालापूर्वी ऋषी सुनक यांनी रविवारी सांगितले होते की, कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतृत्वाच्या शर्यतीत त्यांचा पराभव झाल्यास पुढील सरकारला सहकार्य करणार. निकाल जाहीर होण्यापूर्वी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत भारतीय वंशाच्या ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक म्हणाले की परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांच्याकडून पराभूत झाल्यास संसदेचे सदस्य राहण्याची त्यांची योजना आहे. पराभव झाल्यास तुमची भविष्याची योजना काय आहे, असा प्रश्न सुनक यांना विचारलं असता ते म्हणाले की, मी कंझर्व्हेटिव्ह सरकारला सर्व प्रकारे पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहे.
बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा
दरम्यान, बोरिस जॉन्सन यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत भारतीय वंशाचे अर्थ मंत्री ऋषी सुनक आणि आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला होता. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधून एका दिवसात 39 मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे जॉन्सन यांच्यावर राजीनाम्याचा मोठा दबाव निर्माण झाला होता. त्यानंतर बोरिस जॉन्सन यांनाही राजीनाम द्यावा लागला होता.