Tom and Jerryचे दिग्दर्शक जीन डाइच यांचं 95व्या वर्षी निधन
Tom and Jerry, Popeye the sailor man यांसारख्या लोकप्रिय कार्टून्सचे निर्माते जीन डाइच यांचं निधन झालं असून ते 95 वर्षांचे होते. जीन डाइच यांनी टॉम अॅन्ड जेरीचे एकूण 13 एपिसोड्स तयार केले होते.
मुंबई : प्रसिद्ध कार्टून कॅरेक्टर्स Tom and Jerry, Popeye the sailor man यांसारख्या लोकप्रिय कार्टून्सचे निर्माते जीन डाइच यांचं वयाच्या 95व्या वर्षी निधन झालं आहे. जीन डाइच 16 एप्रिल रोजी आपल्या राहत्या घरात मृत अवस्थेत आढळून आले. त्यानंतर 18 एप्रिल रोजी त्यांच्या जवळच्या लोकांपैकी एक असलेल्या पीटर हिमल यांनी जीन डाइच यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला.
संपूर्ण जगाला आपल्या कार्टून कॅरेक्टर्सनी भूरळ घालणारे जीन आधी उत्तर अमेरिकेमध्ये सैन्यात काम करत होते. ते सैन्यातील पायलट्सना ट्रेनिंग देणं आणि सैन्यासाठी ड्राफ्टमॅनचं काम करत होते. परंतु, प्रकृतीच्या तक्रारींमुळे त्यांना 1944मध्ये सैन्य दलातून काढून टाकण्यात आलं.
सैन्यदलानंतर जीन डाइच यांनी अॅनिमेशनमध्ये आपलं पुढिल करिअर करण्याचा निर्णय घेतला. यांनीच जगाला टॉम अॅन्ड जेरी ही हिट जोडी दिली. अॅनिमेशनमध्ये जीन डाइच यांनी खूप काम केलं पण त्यांना खरी ओळख लोकप्रिय कार्टून कॅरेक्टर्स टॉम अॅन्ड जेरी, पोपाय द सेलर मॅन यांच्यामुळे मिळाली. आपल्या उत्तम दिग्दर्शनासाठी त्यांना चार वेळा ऑस्कर नॉमिनेशनही मिळालं आहे. एवढचं नाहीतर 1967मध्ये चित्रपट मुनरोसाठी त्यांना ऑस्कर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. जीन डाइच यांनी टॉम अॅन्ड जेरीचे एकूण 13 एपिसोड्स तयार केले होते.
टॉम अॅन्ड जेरी एक असं कार्टून आहे, जे कोणत्याही वयातील व्यक्तींना आपल्या मोहात पाडतं. आणि याचं श्रेय जातं, जीन डाइच यांना. या कार्टूनमध्ये दोन मुख्य कॅरेक्टर्स आहेत. एक मांजर (टॉम) आणि दुसरं उंदिर (जेरी). दोघेही एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. परंतु, याचबरोबर दोघेही एकमेकांची मदत करतात. दोघे एकमेकांना सहनही करू शकत नाहीत. पण एकमेकांशी भांडल्याशिवाय राहूही शकत नाहीत.
टॉम अॅन्ड जेरीची भांडणं, मैत्री लोकांना आपल्याकडे आकर्षित करते. यामधून एकमेकांविषयीचा तिरस्कार आणि प्रेम यांचं नातं फार सुंदररित्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या कार्टूनमध्ये एकही डायलॉग नाही. संपूर्ण कार्टून्सचे एपिसोड्स फक्त म्युझिकवर चालतात. तरिही हे अजुनही लोकांच्या मनाचा ठाव घेत आहे.
संबंधित बातम्या :
#LockdownOnDomesticViolence | घरगुती हिंसेविरोधात आवाज उठवण्याचं बॉलिवूडकरांचं चाहत्यांना आवाहन
आता माझी सटकली...! जेव्हा अजय देवगणला डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांचा राग येतो..