Man With 100 Wives : 100 बायकांबरोबर थाटला संसार, 500 मुलांचा 'बाप'; 'या' व्यक्तीची सर्वदूर चर्चा
King, Abumbi II Wives : कॅमरून (Cameroon) देशामध्ये अजूनही बहुपत्नीक परंपरा कायम आहे. ग्रामीण भागात प्रचलित या परंपरेनुसार, पुरुषांना एकाहून अधिक लग्न करण्याची परवानगी आहे.
African King With 500 Children : इतिहास पाहिल्यावर आपल्याला दिसून येतं की, जुन्या काळामध्ये राजांच्या (King) अनेक राण्या (Queen) असायच्या. त्याकाळात बहुपत्नीत्वाची (Bigamy) परंपरा, ही प्रतिष्ठेची बाब मानली जायची. याकडे सामंजस्य करार म्हणूनही पाहिलं जायचं, त्यामुळे एका राजाच्या अनेक राण्या असायच्या. ही बाब जुन्या काळी फार सामान्य होती पण, आधुनिक काळात एका राजाच्या अनेक राण्या आणि शेकडो मुलं असल्यावर आश्चर्य वाटणारच. सध्याच्या आधुनिक जगातही एका पुरुषाच्या 100 पत्नी आणि 500 मुलं आहेत. हो, हे ऐकून तुम्हाला नवल वाटेल, पण हे खरं आहे.
100 बायकांबरोबर थाटला संसार, 500 मुलांचा 'बाप'
आफ्रिकेतील राजाने तब्बल 100 बायकांबरोबर संसार थाटला असून तो 500 मुलांचा बाप आहे. आफ्रिकेतील कॅमरून (Cameroon) देशातील राजा अबूम्बी II (African King Abumbi II) याच्या 100 पत्नी आणि 500 मुलं आहेत. आफ्रिकन राजा अबूम्बीने II (King Abumbi II) त्यांच्या दिवंगत वडीलांच्या राण्यांचाही पत्नी म्हणून स्वीकार केला. त्यानंतर आता त्याच्या एकूण 100 राण्या आहेत.
वारसा हक्काने मिळाल्या अनेक राण्या
कॅमेरूनमध्ये जेव्हा एखादा राजा मरण पावतो तेव्हा त्याच्या वारसांना त्याच्या सर्व बायका वारसाहक्काने मिळतात, अशी तेथील प्रथा आहे. यामुळे दिवंगत वडीलांच्या राण्यांचाही पत्नी म्हणून स्वीकार केल्यावर आता अबुंबी II ला सुमारे 100 राण्या आहेत. या सर्व पत्नींपासून त्याला 500 हून अधिक मुले आहेत. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, अबुंबीची तिसरी पत्नी क्वीन कॉन्स्टन्स म्हणाली, 'प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते.
काय म्हणाली अबुंबीची तिसरी पत्नी?
अबुंबीची तिसरी पत्नी क्वीन कॉन्स्टन्सने प्रतिक्रिया देत सांगितले की, 'ही आमची परंपरा आहे. जेव्हा तुम्ही राजा असता तेव्हा राजाला वारसा हक्काने मिळालेल्या वृद्ध बायका ही परंपरा तरुण पत्नींकडे सोपवतात. तसेच राजाला परंपरा शिकवणे ही सुद्धा वयोवृद्ध पत्नींची जबाबदारी असते. कारण राजा आधी राजपुत्र होता. स्थानिक परंपरेनुसार, अबुंबीला त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्या अनेक राण्यांचा वारसा मिळाला आणि त्यांपासून त्याला 500 मुले आहेत.
अनेक भाषा बोलतात राण्या
राजा अबुम्बी II च्या सर्व राण्या अनेक भाषा बोलतात आणि शिक्षणात पारंगत आहेत. कॅमेरूनमध्ये आज बहुपत्नीत्वाच्या परंपरेला विरोध होताना दिसत आहे. पूर्वीपेक्षा आता खूप कमी लोक बहुपत्नीत्वाच्या परंपरा पाळतात. राजा अबुंबी म्हणाले की, 'आपल्या लोकांची संस्कृती आणि त्यांच्या स्थानिक परंपरा जतन करणे हे त्यांचे काम आहे.'
महत्त्वाच्या इतर बातम्या
अरे देवा... 'या' शहरात पँट न घालताच फिरतायत महिला आणि पुरुष; 'हे' आहे कारण