भारतात तयार होणार टीबीची लस? सहा राज्यांमध्ये 12 हजार स्वयंसेवकांवर चाचणी सुरू
भारतात टीबीची लस (Tb Vaccine) तयार होणार आहे. या लसीची सहा राज्यांमध्ये 12 हजार स्वयंसेवकांवर चाचणी सुरू आहे.
Tb Vaccine : टीबीवरील लशीच्या क्लिनिकल चाचण्या वेगाने सुरू आहेत. त्यामुळे 2024 पर्यंत ही लस पूर्ण होण्याची शक्यता आहे. भारतातील सहा राज्यांमधील 18 ठिकाणी या लसीची चाचणी सुरू असून त्यात 12 हजारांहून अधिक स्वयंसेवकांचा समावेश आहे, असी माहिती ICMR अंतर्गत येणार्या NARI म्हणजेच नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे यांनी दिली आहे.
टीबीवरील लसीच्या चाचणीत सहभागी असलेले NARI पुणेचे डॉ. सूचित कांबळे यांनी या चाचणीबाबत एबीपी न्यूजशी खास बातचीत केली आहे.
डॉ. सूचित कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, " ICMR अंतर्गत असलेल्या इंडिया टीबी रिसर्च कंसोर्टियम अंतर्गत भारतातील सहा राज्यांमध्ये दोन लसींची चाचणी सुरू आहे. ही क्लिनिकल चाचणी व्हीपीएन 1002 आणि इम्युनोव्हॅक हे क्षयरोग रोखू शकते की नाही? आणि ते सुरक्षित आहे की नाही? याची चाचणी सुरू आहे. यासाठी भारतात एकूण 18 ठिकाणी क्लिनिकल चाचण्या सुरू असून 12 हजारांहून अधिक लोकांनी चाचणीसाठी नोंदणी केली आहे. ज्यांच्या घरात टीबीची केस आढळून आली आहे, असे लोक क्लिनिकल चाचणीसाठी स्वयंसेवक आहेत.
क्षयरोग कोणालाही होऊ शकतो. परंतु क्षयरोगाची लागण झालेल्या लोकांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांनाही काही प्रमाणात टीबी होऊ शकतो. त्यांच्यामध्ये टीबी पसरण्याचा धोका थोडा जास्त असतो. त्यामुळे अशा लोकांचा चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती. डॉ. कांबळे यांनी दिली आहे.
डॉ. कांबळे यांनी सांगितले की, सध्या सुरू असलेली रोग प्रतिबंधक चाचणी आहे. ज्यांना क्षयरोग होण्याचा धोका जास्त आहे अशा लोकांना ते दिले जाऊ शकते. दरम्यान, चाचणी अद्याप सुरू असून, या चाचणीचा पाठपुरावा फेब्रुवारी 2024 पर्यंत चालणार आहे. त्यानंतर सर्व 18 साइटचा डेटा समोर येईल. या डेटाचा अहवाल पाहिल्यानंतर या चाचणीबाबत निर्णय घेण्यात येईल.
महत्वाच्या बातम्या
- World Autism Day : ऑटिझम म्हणजे काय? लक्षणं नेमकी कोणती? उपाय काय? जाणून घ्या माहिती
- Lemon Benefits : छोट्याशा लिंबाचे गुणकारी फायदे, अनेक रोगांवरही रामबाण उपाय!
- Health Tips : बीटा कॅरोटीन शरीरासाठी का महत्त्वाचे आहे? जाणून घ्या कोणत्या पदार्थांतून कोणते गुणधर्म मिळतात
- Health Tips : दररोज कॉफीचे सेवन हृदयासाठी चांगले? जाणून घ्या तज्ञांचं म्हणणं