Japan Princess: कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रियकराशी लग्न केलेल्या जपानच्या राजकुमारीचा पती न्यूयॉर्क स्टेट बार परीक्षेत नापास
Japan Princess: राजकुमारी माको 29 वर्षांची असून जपानचे माजी राजा अकिहितो यांची नात आहे. 2017 मध्ये तिने तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न केले. केई कोमुरो एका साध्या कुटुंबातील आहे.
Japan Princess Husband Failed in Exam: जपानचे राजघराणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याचं कारण म्हणजे जपानच्या राजकुमारीचा पती न्यूयॉर्क स्टेट बार परीक्षेत (New York State Bar Exam) नापास झाला आहे. जपानच्या रॉयल फॅमिलीची राजकुमारी माकोने (Japan Royal Family Princess Mako) आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन काही दिवसांपूर्वी तिचा बॉयफ्रेंड (BoyFriend) केई कोमुरोसोबत (Kei Komuro) लग्न केले होते. तेव्हापासून त्यांचे नाते चर्चेत होते.
'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, राजकुमारी माकोने (Princess Mako) पती केई कोमुरोसोबत (Kei Komuro) न्यूयॉर्क स्टेट बारची परीक्षा (New York State Bar Exam) दिली. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी न्यूयॉर्क स्टेट बोर्ड ऑफ लॉ एक्झामिनर्सने जाहीर केला. या परीक्षेतील यशस्वी उमेदवारांच्या यादीत मेकोचे पती केई कोमुरो यांचे नाव नाही. निकाल जाहीर झाल्यानंतर, केई कोमुरो म्हणाले की, मी हिंमत गमावली नाही आणि पुढील वर्षी फेब्रुवारीच्या परीक्षेत पुन्हा प्रयत्न करेन.
राजकुमारी माको कोण आहे?
राजकुमारी माको 29 वर्षांची आहे आणि जपानचे माजी राजा अकिहितो यांची नात आहे. 2017 मध्ये तिने तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न केले. विशेष म्हणजे केई कोमुरो एका सामान्य कुटुंबातून येतात आणि अमेरिकेत एका लॉ कंपनीत काम करतात.
जपानचा शाही नियम
या दोघांचे हे नाते राजघराण्याला अजिबात मंजूर नव्हते. यानंतर माकोने घरच्यांच्या इच्छेविरुद्ध कोमुरोशी लग्न केले. जपानमध्ये, शाही कुटुंबातील सदस्याने सामान्य व्यक्तीशी लग्न केले तर त्याचे शाही सिंहासन जाते. तो एक सामान्य माणूस म्हणून राहतो.
सत्ता, राजेशाहीवर पाणी..
प्रेम पैशाच्या तराजूत तोलता येत नाही असं म्हणतात, हेच जपानच्या राजकुमारीनं सिद्ध करुन दाखवल आहे. सत्ता, राजेशाहीवर पाणी सोडत जपानची राजकुमारी माकोनं तिच्या कॉलेज प्रियकराशी लग्न केले आहे. सत्ता, राजेशाहीवर पाणी सोडत जपानची राजकुमारी माको हीनं तिच्या कॉलेज प्रियकराशी लग्न केलंय. केई कोमुरो असं तिच्या प्रिकराचं नाव आहे. विशेष म्हणजे राज घराण्याबाहेर लग्न केल्यानंतर राजेशाही पदवी राजघराण्याला देण्याच्या मोबदल्यात साडे सात कोटी रुपये देण्यात येतात. मात्र जपानच्या राजकुमारीनं तेही घेण्यास नकार दिला आहे.