एक्स्प्लोर
Advertisement
जॅकी चॅनची मुलगी बेघर, रस्त्यावर राहण्याची वेळ
तर जॅकी चॅनने मुलीबाबत सार्वजनिकरित्या कोणतंही भाष्य केलं नाही.
शांघाय : अॅक्शन सुपरस्टार म्हणून जगभरात लोकप्रिय असलेल्या जॅकी चॅनच्या मुलीवर रस्त्यावर राहण्याची वेळ आहे. लेस्बियन असल्यामुळे माझ्या पालकांनी मला घरातून बाहेर काढलं आहे. सध्या मी बेघर असून रस्त्यावर राहण्याची वेळ माझ्यावर आली आहे, तिने सांगितलं. एटा एनजी असं जॅकी चॅनच्या मुलीचं नाव आहे.
एटा-गर्लफ्रेण्डचा व्हिडीओ
"समलिंगी संबंधांचा तिरस्कार करणाऱ्या आई-वडिलांमुळे आम्ही एक महिन्यापासून बेघर आहोत. अनेक रात्री आम्ही पुलाच्या खाली आणि इतर ठिकाणी घालवल्या. आम्ही पोलिस, रुग्णालय, फूड बँक, एलजीबीटीक्यू समाजाकडे गेलो, पण कोणीही आमची मदत केली नाही. आता काय करायचं हे आम्हाला समजत नाही. आम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहोत हे लोकांना समजावं एवढीच आमची इच्छा आहे. कारण कोणीच आमची मदत करत नाही, हे फारच घृणास्पद आहे," असं एटा एनजीने म्हटलं आहे.
मुलीबाबत भाष्य नाही
तर जॅकी चॅनने मुलीबाबत सार्वजनिकरित्या कोणतंही भाष्य केलं नाही. पण एटा समलिंगी असल्याच्या वृत्ताला त्याने दुजोरा दिला आहे. जॅकी चॅन आणि माजी ब्युटी क्वीन एलायने एनजी यांची एटा ही मुलगी आहे. पण जॅकीने एलायनेसोबत लग्न केलं नाही. दोघे रिलेशनशिपमध्ये होते. परंतु जॅकी चॅनने जोआन लिनसोबत लग्न केलं.
काम शोधा : आईचा सल्ला
दुसरीकडे एलायनेने मुलगी एटाचा दावा खोटा असल्याचं सांगितलं. व्हिडीओ बनवण्यापेक्षा काहीतरी काम शोधा, असा सल्ला या दोघींना दिला आहे. तुमच्याकडे पैसे नाहीतर तर काम शोधा. अशाप्रकारे व्हिडीओ पोस्ट करुन आपल्या परिस्थितीबाबत आणि आपले वडील कोण आहेत हे सांगण्याची गरज नाही. जगभरातील लोक मेहनत करुन खर्च करतात. कोणीही पैसा कमावण्यायठी इतरांच्या प्रसिद्धीचा फायदा घेणं चुकीचं आहे, असं एटाच्या आईने म्हटलं.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
महाराष्ट्र
बीड
Advertisement