एक्स्प्लोर

Israel Strikes on Iran: मोठी बातमी : इस्रायलचा इराणवर सर्वात मोठा हल्ला, आण्विक ठिकाणांना केलं टार्गेट; फायटर जेटने हल्ला केल्याची माहिती

Israel Strikes on Iran: इस्रायलने इराणच्या आण्विक ठिकाणांवर हल्ले केल्याची माहिती समोर येत आहे. इस्रालयच्या हल्ल्यात आमचा सहभाग नसल्याचे स्पष्टीकरण अमेरिकेने दिले आहे.

Israel Strikes on Iran: इस्रायलने इराणच्या आण्विक ठिकाणांवर हल्ले केल्याची माहिती समोर येत आहे. इराणच्या लष्करी तळांनादेखील  इस्रायलकडून लक्ष्य करण्यात आले आहे. इस्रायलनं फायटर जेटनं हल्ले केल्याची माहिती अमेरिकेने दिली आहे. ईरानच्या माध्यमांनीही या स्फोटांची पुष्टी केली आहे. तर इस्रालयच्या हल्ल्यात आमचा सहभाग नसल्याचे स्पष्टीकरण अमेरिकेने दिले आहे. स्वसंरक्षणासाठी हल्ले केल्याची माहिती इस्रायलने अमेरिकेला दिल्याचे समजते.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी याबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांच्या सैन्याने इराणच्या प्रमुख अणुशास्त्रज्ञांना लक्ष्य केले आहे, जे कथितपणे अणुबॉम्ब तयार करण्याच्या कामात गुंतले होते. त्याचबरोबर त्यांनी असा दावा केला की, इस्रायली सैन्याने इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या केंद्रावरही अचूक हल्ला केला आहे. इस्रायलने या कारवाईला "Strength of a Lion" असे नाव दिले आहे. नेतन्याहूंनी हवाई हल्ल्याबाबत सांगितले की, इस्रायलच्या अस्तित्वासाठी इराणकडून निर्माण होणारा धोका लक्षात घेता, "ऑपरेशन राइजिंग लायन" सुरू करण्यात आले आहे. हा हल्ला तोपर्यंत सुरू राहील जोपर्यंत हा धोका पूर्णपणे संपत नाही.

इराणी चीफ ऑफ स्टाफ मोहम्मद बाघेरी यांच्या मृत्यूचा दावा

मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या लष्करी मुख्यालयावर, दोन अणुऊर्जा केंद्रांवर, IRGC (इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स) च्या वरिष्ठ कमांडरांवर आणि अणुशास्त्रज्ञांवर लक्ष्य करून हल्ले करण्यात आले आहेत. इराणच्या सशस्त्र दलांचे चीफ ऑफ स्टाफ मोहम्मद बाघेरी यांना ठार मारण्यात आले आहे, असा दावा देखील इस्रायलने केला आहे. दरम्यान, इराणच्या माध्यमांनी, दोन अणुऊर्जा स्थळांवर हल्ले झाल्याची पुष्टी केली आहे.

इराणचा आण्विक कार्यक्रम हल्ल्याचे कारण 

इस्रायल आणि इराण यांच्यात अनेक वर्षांपासून तणावाचे संबंध आहेत. इस्रायलने यापूर्वीही इशारा दिला होता की, जर इराणने शस्त्र बनवण्यायोग्य युरेनियमचा संवर्धन प्रकल्प सुरूच ठेवला, तर तो लष्करी कारवाई करेल. आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचे म्हणणे आहे की, इराणचे युरेनियम संवर्धन कार्य आता शस्त्रनिर्मितीच्या पातळीपर्यंत पोहोचले आहे.

अमेरिकेने हल्ल्यातील सहभाग नाकारला 

इस्रायलच्या या ऑपरेशनमध्ये अमेरिकेचा सहभाग असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी स्पष्टपणे सांगितले की, या हल्ल्याशी अमेरिकेचा काहीही संबंध नाही. "इस्रायलने ही कारवाई आपल्या स्वसंरक्षणाच्या हितासाठी केली आहे. आमची प्राथमिकता आमच्या सैनिकांच्या सुरक्षिततेची आहे," असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर अमेरिकन सैनिकांवर किंवा तळांवर हल्ला करू नये, असा इशारा देखील त्यांनी इराणला दिला आहे.  

आणखी वाचा 

Ahmedabad Air India Plane Crash: स्फोटामुळे मृतदेहांचा कोळसा झाला, डीएनए टेस्टने ओळख पटवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांच्या रांगा

महत्त्वाच्या बातम्या

प्रत्येक नागरिकाला मिळणार 26000 रुपये, 'या' देशाचा महत्वपूर्ण निर्णय, आर्थिक वाढीचा थेट सामान्य लोकांना फायदा
प्रत्येक नागरिकाला मिळणार 26000 रुपये, 'या' देशाचा महत्वपूर्ण निर्णय, आर्थिक वाढीचा थेट सामान्य लोकांना फायदा
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
UAE Missile Alert : क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 

व्हिडीओ

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget