एक्स्प्लोर

Ahmedabad Air India Plane Crash: स्फोटामुळे मृतदेहांचा कोळसा झाला, डीएनए टेस्टने ओळख पटवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांच्या रांगा

Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटना: 265 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 10 जणांचा समावेश. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्टचा वापर होणार

Air India Plane Crash: एअर इंडियाच्या अहमदाबादवरुन इंग्लंडला निघालेल्या बोईंग ड्रीमलायनर या विमानाचा गुरुवारी दुपारी भीषण अपघात झाला होता. या अपघातात विमानातील 241 जणांचा मृत्यू झाला होता. एअरपोर्टवरुन उड्डाण केल्यानंतर काहीवेळातच हे विमान जवळच्या मेघानी नगरमध्ये कोसळले होते. विमान कोसळल्यानंतर प्रचंड मोठा स्फोट झाला होता आणि आग लागली होती. त्यामुळे विमानातील प्रवाशांना जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही. विमान कोसळल्यानंतर लागलेल्या आगीमुळे विमानातील प्रवासी आणि क्रू मेंबर्सचे मृतदेह पूर्णपणे जळाले आहेत. या मृतदेहांचा कोळसा झाल्यामुळे प्रवाशांची ओळख पटवणे अवघड होऊन बसले आहे. 

त्यामुळे आता प्रवाशांच्या मृतदेहांची डीएनए टेस्ट करुन त्यांची ओळख पटवली जाणार आहे. अहमदाबाद येथील कसोटी भवनमध्ये मृतदेहांच्या डीएनए टेस्ट सुरु आहेत. त्यासाठी मृतांच्या नातेवाईकांना कसोटी भवन येथे बोलावण्यात आले आहे. या अपघातात विमानातील 241 जण आणि मेघानी नगरच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेसमधील 24 डॉक्टरांचा समावेश आहे. इतक्या मोठ्या संख्येने मृतदेह असल्याने त्यांची डीएनए टेस्ट करण्यासाठी बराच वेळ जाणार आहे. मृतदेहांची ओळख पटल्यानंतर ते नातेवाईकांकडे सुपूर्द केले जातील. सध्या कसोटी भवन येथे डीएनए सॅम्पलिंग प्रक्रिया सुरु आहे. 

आतापर्यंत 192 नातेवाईकांच्या डीएनए टेस्ट करण्यात आल्या आहेत . डी एन ए टेस्ट आणि डीएनए मॅच साठी 72 तास लागणार आहेत. काहींचे नातेवाईक हे देशाबाहेर असल्याने अजूनही काही जणांच्या डीएनए टेस्ट करणे बाकी आहेत.  डी एन ए मॅच झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना सोपवले जातील. 

Air India Plane Crash: पुणे-अहमदाबाद विमानांना उशीर

अहमदाबाद लंडन विमान अपघातामुळे अहमदाबाद विमानतळ काही वेळ बंद ठेवण्यात आले होते.त्यामुळे पुण्यातून अहमदाबादला जाणाऱ्या दोन विमानांना फटका बसला. एका विमानाच्या उड्डाणाला पाच तास उशीर झाला.तर, दुसऱ्या विमानाला एक तास उशीर झाला. इंडिगो कंपनीचे विमान दुपारी तीन वाजून ५० मिनिटांनी अहमदाबादसाठी उड्डाण करणार होते.मात्र, अपघाताच्या घटनेमुळे या विमानाला उशीर झाला. हे विमान रात्री नऊ वाजता पाच तास उशिराने उड्डाण केले. तर,अक्सा एअर कंपनीचे विमान पुण्यातून सायंकाळी पाच वाजून ५५ मिनिटांनी अहमदाबादसाठी उड्डाण करणार होते. मात्र, ते विमान रात्री पावणे सात वाजता सुटले. त्यामध्ये अहमदाबादला जाणाऱ्या प्रवाशांना फटका बसला.

आणखी वाचा

एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा Black Box सापडला; नेमकं काय घडलं?, A टू Z समजणार!

माझ्या आजुबाजूला मृतदेहांचा खच अन् विमानाचे तुकडे; विमान दुर्घटनेतून वाचलेल्या एकमेव प्रवाशाने काय सांगितलं?

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?

व्हिडीओ

Mumbai congress Nagarsevak : BMC मध्ये काँग्रेसचे 24 नगरसेवक, कोणते मुद्दे घेऊन पालिकेत जाणार?
Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
Embed widget