इस्रायलच्या पंतप्रधानांचा मुलगा हमासविरोधात रणांगणात?

Israel Palestine War : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या 7 ऑक्टोबरला युद्धाला सुरुवात झाली असून संघर्ष कायम आहे. आतापर्यंत 3000 लोकांचा मृत्यू झाला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Oct 2023 03:55 PM
Israel Hamas Conflict : इस्रायलचा हमासच्या 450 तळांवर हल्ला

इस्रायली लष्कराने ट्विटर पोस्टमध्ये लिहिलं आहे की, इस्रायली हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी अल-फुरकान परिसरात हमासच्या 200 हून अधिक ठिकाणांवर हल्ला केला. येथे हमास दहशतवाद्यांचा हॉटस्पॉट होते, जिथून हमासकडून इस्रायल हल्ल्यांचे कट आखण्यात येत होते. गेल्या 24 तासांत इस्रायलचा हमासवरील या भागातील हा तिसरा काउंटरस्ट्राईक आहे. यामध्ये इस्रायलने तीन स्ट्राईकमध्ये हमासच्या 450 तळांवर हल्ला करण्यात आला.

Israel Hamas War : हमासचा मास्टमाईंड! प्रत्येक वेळी मृत्यूला चकवा देणारा मोहम्मद दाईफ कोण आहे?

Israel Palestine Conflict : हमासचा प्रमुख मोहम्मद दाईफ प्रत्येक वेळी मृत्यूला चकवा देऊन निसटतो. हात-पाय आणि एक डोळा नसलेल्या या प्रमुखाच्या सांगण्यावरून हमासची सूत्रे हलतात.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

इस्रायलच्या पंतप्रधानांचा मुलगा हमासविरोधात रणांगणात?

इस्रायल आणि हमास युद्धात इस्रायलचे शेकडो नागरिक आणि सैनिक मारले गेले आहेत. इस्रायली सैन्य हमासला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. या युद्धात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू (Isreal PM Benjamin Netanyahu) त्यांच्या मुलालाही (Isreal PM's Son) देश रक्षणासाठी युद्धात पाठवल्याचं बोललं जात आहे. सोशल मीडियावर अशा आशयाचे फोटो आणि ट्वीट व्हायरल होत आहेत.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Israel Hamas War: भीतीचे वातावरण, बॉम्बस्फोट आणि सायरनचा आवाज; इस्त्रायलमधून भारतात सुखरूप परतलेल्या गायकांनी सांगितला थरारक अनुभव
Israel Hamas War: शरद शर्मा (Sharad Sharma) आणि चेतन राणा (Chetan Rana) हे दोन गायक इस्रायलमधील अश्कलॉनमधील हॉटेलमध्ये अडकले होते.  Read More
Israel-Hamas Conflict : इस्रायल-हमास युद्धात 3000 जणांचा मृत्यू

Israel-Palestine Conflict : आज, बुधवारी या युद्धाचा पाचवा दिवस आहे. मंगळवारी रात्री समोर आलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत या युद्धात 3000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पॅलेस्टिनी आणि इस्रायली नागरिक तसेच सैनिकांचा समावेश आहे.

Israel-Hamas War : हमासकडून 40 निरपराध बालकांची हत्या; गाठला क्रूरतेचा कळस

Israel-Gaza War : हमासने इस्रायलमध्ये घुसखोरी करत नागरिकांवर हल्ला केला. हमासच्या दहशतवाद्यांनी अत्यंत क्रूरपणे 40 बालके आणि लहान मुलांची हत्या केली. वाचा सविस्तर...



 


Israel Hamas Conflict : इस्रायलकडून हमासच्या म्होरक्यांची हिटलिस्ट तयार

हमासकडून हवाई हल्ले सुरु असून इस्रायलमध्ये घुसूनही नागरिकांवर हल्ले केले जात आहेत. तर इस्रायल लष्कराकडूनही गाझा पट्टीत जोरदार हल्ले केले जात आहेत. गाझामधून इस्रायलवर अनेक रॉकेट डागले जात आहेत, ज्यांचं प्रत्युत्तर करणं इस्रायलसाठी अवघड जाता दिसत आहे. यामुळे आता इस्रायल लष्कराने हमासच्या कमांडरांची हिटलिस्ट तयार करण्यात आली असून त्यांना कंठस्नान घालण्याची तयारी सुरु आहे. या ऑपरेशनसाठी इस्रायल लष्कर डेथ स्क्वॉड तयार करत आहे. इस्रायली डेथ स्क्वॉड हमासच्या म्होरक्यांचा खात्मा करणार आहे. वाचा सविस्तर...

Israel Hamas Conflict : इस्रायलकडून हमासचे 15 कमांडर निशाण्यावर

इस्रायल आणि पॅलेस्टाईन (Israel-Palestine War) यांच्यातील युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले केले जात आहेत. इस्रायल लष्कर हमासचं अस्तित्व मिटवण्यासाठी सज्ज झाले आहेत. आता इस्रायलने पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासच्या दहशतवाद्यांची हिटलिस्ट तयार करण्यात आली आहे. इस्रायल लष्कर आता एक-एक करून या दहशतवाद्यांच्या खात्मा करणार आहे. या हिटलिस्टमध्ये टॉपवर हमास संघटनेचा प्रमुख इस्माइल हानियह हा आहे. इस्माइल हानियह इस्रायलवरील हल्ल्यामागे याचा हात असल्याचं सांगितलं जात आहे.

पार्श्वभूमी

Israel Hamas Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यात युद्ध सुरु आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. या संघर्षात आतापर्यंत 3000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पॅलेस्टिनी आणि इस्रायली नागरिकांसह विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. शनिवारी, 7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलला लक्ष्य करत विविध शहरांवर हवाई, समुद्री आणि जमिनीवरून हल्ले करत युद्धाला सुरुवात केली. हमासने इस्रायलवर सुमारे 5000 हून अधिक रॉकेट डागले आहेत. इस्रायल लष्कराकडूनही हमासवर प्रतिहल्ले सुरु आहेत. इस्रायलकडून गाझातील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करुन त्यांचे तळ उदध्वस्त करण्यात येत आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.