Israel Hamas War: भीतीचे वातावरण, बॉम्बस्फोट आणि सायरनचा आवाज; इस्त्रायलमधून भारतात सुखरूप परतलेल्या गायकांनी सांगितला थरारक अनुभव
Israel Hamas War: शरद शर्मा (Sharad Sharma) आणि चेतन राणा (Chetan Rana) हे दोन गायक इस्रायलमधील अश्कलॉनमधील हॉटेलमध्ये अडकले होते.
Israel Hamas War: इस्रायल आणि (Israel) हमास (Hamas) यांच्यात सुरु असलेल्या युद्धादरम्यान अश्कलॉनमधील एका हॉटेलमध्ये दोन भारतीय गायक अडकले होते. सारेगामापा 2021 या सिंगिंग रिअॅलिटी शोचा स्पर्धक शरद शर्मा (Sharad Sharma) आणि 'के फॉर किशोर' या शोमधील स्पर्धक चेतन राणा (Chetan Rana) हे दोन गायक अश्कलॉनमधील हॉटेलमध्ये अडकले होते.
शरद शर्मा आणि चेतन राणा हे दोन्हीही गायक त्यांच्या म्युझिक टीमसोबत 4 आणि 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या संगीत कार्यक्रमासाठी 3 ऑक्टोबरच्या रात्री इस्रायलला पोहोचले होते. त्यानंतर गायक आणि त्यांची संपूर्ण टीम 7 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5.00 वाजताच्या फ्लाइटने भारतामध्ये येणार होती. पण 7 ऑक्टोबरच्या पहाटे शरद, केतन आणि संपूर्ण टीमला बॉम्बस्फोट आणि सायरनच्या आवाजाने जागा झाली आणि संपूर्ण हॉटेलमध्ये गोंधळाचे वातावरण पसरले.
एबीपी न्यूजशी संवाद साधताना शरद आणि चेतन या दोन्ही गायकांनी सांगितले की, हॉटेलमधील सर्व लोकांना बंकरमध्ये उपस्थित राहून तेथे लपून राहण्यास सांगितले गेले. तेथून शरद आणि चेतन यांनी बाहेर उडणाऱ्या क्षेपणास्त्रांचे आणि बॉम्बस्फोटांचे काही व्हिडिओ शूट केले.
हल्ल्यानंतर हॉटेलमध्ये भीतीचे वातावरण होते आणि विमानतळावर पोहोचेपर्यंत त्यांना भीती वाटत होती, असं दोन्ही गायकांनी सांगितले. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलमधील परिस्थितीबद्दल शरद आणि केतन या दोघांनी एबीपी न्यूजशी संवाद साधला.
Instagram पर यह पोस्ट देखें
गायक शरद शर्माचे युट्यूब चॅनल आहे. या युट्यूब चॅनलवर त्यानं इस्रायल ते मुंबई या त्याच्या प्रवासाचा एक व्लॉग शेअर केला आहे. या व्लॉगच्या सुरुवातीला क्षेपणास्त्र,बॉम्बस्फोट इत्यादींची काही दृष्ये दिसत आहेत. या व्लॉगच्या शेवटी दिसते की, शरद शर्मा आणि त्याची संपूर्ण टीम मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर आनंद व्यक्त करतात.
इस्रायल आणि हमास (Hamas) या अतिरेकी संघटनेत सध्या युद्ध सुरू असून त्यात आतापर्यंत शेकडो निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायल (Israel) देखील आता चांगलाच खवळला आहे. हमासचं अस्तित्व कायमचं नष्ट करू, असा पवित्रा इस्रायलने घेतला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान अभिनेत्री नुरसात भरुचा देखील इस्रायलमध्ये अडकली होती. 8 ऑक्टोबर रोजी ती भारतात सुखरूप परतली.
संबंधित बातम्या: