एक्स्प्लोर

Israel-Hamas War : चुन-चुन के बदला! इस्रायलकडून हमासची हिटलिस्ट तयार, म्होरक्या इस्माइलसह 15 कमांडर निशाण्यावर

Israel-Palestine Conflict : इस्रायलने हमासच्या म्होरक्यांची हिटलिस्ट तयार करण्यात आली आहे. इस्रायल लष्कराकडून हमासचं अस्तित्व पूर्णपणे मिटवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Israel-Palestine War Update : इस्रायल आणि पॅलेस्टाईन (Israel-Palestine Conflict) यांच्यातील युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले केले जात आहेत. इस्रायल लष्कर हमासचं अस्तित्व मिटवण्यासाठी सज्ज झाले आहेत. आता इस्रायलने पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासच्या दहशतवाद्यांची हिटलिस्ट तयार करण्यात आली आहे. इस्रायल लष्कर आता एक-एक करून या दहशतवाद्यांच्या खात्मा करणार आहे. या हिटलिस्टमध्ये टॉपवर हमास संघटनेचा प्रमुख इस्माइल हानियह हा आहे. इस्माइल हानियह इस्रायलवरील हल्ल्यामागे याचा हात असल्याचं सांगितलं जात आहे.

इस्रायलकडून हमासच्या म्होरक्यांची हिटलिस्ट तयार

हमासकडून हवाई हल्ले सुरु असून इस्रायलमध्ये घुसूनही नागरिकांवर हल्ले केले जात आहेत. तर इस्रायल लष्कराकडूनही गाझा पट्टीत जोरदार हल्ले केले जात आहेत. गाझामधून इस्रायलवर अनेक रॉकेट डागले जात आहेत, ज्यांचं प्रत्युत्तर करणं इस्रायलसाठी अवघड जाता दिसत आहे. यामुळे आता इस्रायल लष्कराने हमासच्या कमांडरांची हिटलिस्ट तयार करण्यात आली असून त्यांना कंठस्नान घालण्याची तयारी सुरु आहे. या ऑपरेशनसाठी इस्रायल लष्कर डेथ स्क्वॉड तयार करत आहे. इस्रायली डेथ स्क्वॉड हमासच्या म्होरक्यांचा खात्मा करणार आहे.

दहशतवाद्यांचा शोधून खात्मा करणार

हमासच्या कमांडर्सची हिटलिस्ट तयार करण्यात आली असून त्यांना शोधून मारलं जाईल, असा दावा इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. हल्ले कधी, कुठे आणि कसे होतील याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. इस्रायली हिटलिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर हमासचा प्रमुख इस्माइल हानियह आहे. इस्नायलनेचं इस्रायलवरील प्राणघातक हल्ल्याचा कट रचला, ज्याला त्याने 'अल अक्सा पूर' असं नाव दिलं. या यादीत याह्या सिनवारच्या नावाचाही समावेश आहे. सिनवार गाझामधील हमासचा मुख्य कमांडर असून इस्रायलवरील या हल्ल्याचाही कमांडर आहे.  

मोहम्मद दाईफ आणि ओबेदा हिटलिस्टमध्ये 

या यादीतील तिसरं नाव हमासचे नेते मोहम्मद दाईफचं आहे. इस्रायलने याआधीही मोहम्मद दाईफला पाचवेळा ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. या हल्ल्यांमध्ये मोहम्मद दाईफला एक डोळा, एक हात आणि दोन्ही पाय गमवावे लागले. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात मोहम्मद दाईफची पत्नी आणि त्यांची दोन मुलेही मारली गेली, पण तो मात्र बचावला. हमासने केलेल्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार (Mastermind) मोहम्मद दाईफ असल्याचा इस्रायलचा दावा आहे. आईक्यूबी (IQB) चा प्रवक्ते अबू ओबेदाचं नावही या हिटलिस्टमध्ये आहे.

हमासच्या  15 कमांडरची हिटलिस्ट

हमासचे 15 कमांडर गाझा पट्टीवर नियंत्रण ठेवत असल्याचं सांगितलं जात आहे. हमासचा प्रमुख इस्माइल हानियह आहे. निवडणूक आणि एका कौन्सिलच्या माध्यमातून हमासचे कमांडर निवडले जातात. डेली मेलच्या वृत्तानुसार, IQB ही हमासची लष्करी शाखा आहे. मारवान इसा आणि मोहम्मद डेफ यांच्या नेतृत्वाखाली हमासची लष्करी शाखा चालवली जाते.

महत्वाच्या इतर बातम्या : 

Israel-Hamas Conflict : इस्रायल-हमास संघर्ष सुरुच, 3000 जणांचा मृत्यू; अनेकांचे संसार उद्धवस्त

महत्त्वाच्या बातम्या

मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
प्रत्येक नागरिकाला मिळणार 26000 रुपये, 'या' देशाचा महत्वपूर्ण निर्णय, आर्थिक वाढीचा थेट सामान्य लोकांना फायदा
प्रत्येक नागरिकाला मिळणार 26000 रुपये, 'या' देशाचा महत्वपूर्ण निर्णय, आर्थिक वाढीचा थेट सामान्य लोकांना फायदा
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Embed widget