Israel Palestine Conflict : इस्रायलमध्ये अडकले भारतीय विद्यार्थी, युद्धाची धक्कादायक परिस्थिती सांगणारा व्हिडीओ व्हायरल
Israel-Hamas War : भारतीय विद्यार्थी इस्रायलमध्ये शिक्षण घेत असून सध्या तेथील तणावपूर्ण परिस्थितीमुळे अडचणीत सापडले आहेत.
Israel Palestine Conflict : इस्रायल आणि हमास (Israel-Hamas War) यांच्यातील संघर्ष अधिक धोकादायक झाला आहे. काही भारतीय विद्यार्थीही (Indian Students) इस्रायलमध्ये अडकले आहेत. भारतीय विद्यार्थी इस्रायलमध्ये शिक्षण घेत असून सध्या तेथील तणावपूर्ण परिस्थितीमुळे अडचणीत सापडले आहेत. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी परराष्ट्र मंत्रालयाचा संपर्क सुरु आहे. इतर देशांतील नागरिकही या संघर्षात अडकले आहेत, तर काही परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अल जझीराच्या वृत्तानुसार, इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात 12 थाई नागरिकांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाल्याची माहिती थायलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली आहे.
इस्रायल आणि हमास संघर्ष
इस्रायली सैन्य गाझा पट्टीच्या बाहेर सात ते आठ ठिकाणी हमाससोबत संघर्ष सुरु असल्याची माहिती इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्याने दिली आहे. इस्रायली लष्कराने गाझा पट्टीतील हमासच्या 500 हून अधिक स्थानांवर एका रात्रीत हल्ले केल्याची माहिती दिली आहे. इस्रायलकडून हमासच्या 653 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं आहे. इस्रायलच्या ऑपरेशन स्वॉर्ड्स ऑफ आयर्न दरम्यान आतापर्यंत 700 हून अधिक इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 2 हजार 150 जण जखमी झाले आहेत.
#WATCH | On Hamas terrorists' attack on Israel, an Indian student in Israel, Aditya Karunanithi Nivedita says, "...It was all very sudden we did not expect it, because there are religious holidays in Israel going on. We got the sirens early in the morning at around 5:30 am. We… pic.twitter.com/U48dhoP2Vs
— ANI (@ANI) October 7, 2023
भारतीय विद्यार्थी इस्रायलमध्ये अडकले
इस्रायलवर हमासच्या दहशतवाद्यांच्या हल्ल्याबद्दल, इस्रायलमध्ये अडकलेली भारतीय विद्यार्थिनी आदित्या करुणानिथी निवेदिता हिने सांगितलं की, "...हे सर्व अचानक झाले होते, ज्याची आम्हाला अपेक्षा नव्हती, कारण इस्रायलमध्ये धार्मिक सुट्ट्या सुरू आहेत. आम्हाला सायरन लवकर वाजले. सकाळी सुमारे 5:30 वाजता. आम्ही बंकरमध्ये होतो सुमारे 7-8 तास सायरन वाजले. आम्हाला आमच्या घरात राहण्यास सांगितले जाते. आम्ही भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहोत आणि ते आम्हाला भविष्यातील गोष्टींसाठी अपडेट करतील."
पाहा व्हिडीओ :
#WATCH | On Hamas terrorists' attack on Israel, an Indian student in Israel, Goku Manavalan says, "I am very nervous and scared...Thankfully we have shelter & Israeli police forces nearby. So far we are safe...We are in touch with Indian Embassy people, we have a good Indian… pic.twitter.com/tPs6pzQlMo
— ANI (@ANI) October 7, 2023
"मी खूप घाबरलोय"
इस्रायलमधील अडकलेला आणखी एक भारतीय विद्यार्थी गोकू मानवलन याने सांगितलं की, "मी खूप घाबरलोय. आमच्याजवळ सुरक्षित आश्रय आणि इस्रायली पोलीस दल मदतीसाठी आहेत. आतापर्यंत आम्ही सुरक्षित आहोत. आम्ही भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहोत. आमच्या आजूबाजूला चांगला भारतीय समुदाय आहे आणि आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत."