Iran vs Israel: डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली पण इराणने इस्रायलवर पुन्हा हल्ला चढवला, आता अमेरिका काय करणार?
Iran vs Israel War: इराणने पुन्हा एकदा इस्रायलवर हल्ला चढवला आहे. इराणची क्षेपणास्त्रं इस्रायलमध्ये अचूक लक्ष्यांवर आदळली असल्याची माहिती आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का

Iran Israel Ceasefire: गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांच्यात सुरु असलेले युद्ध थांबवण्यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली होती. ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण (Iran) यांच्यात शस्त्रसंधी झाल्याचे म्हटले होते. मात्र, इराणने डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेला केराची टोपली दाखवली आहे. कारण सोमवारी सकाळी इराणने पुन्हा एकदा इस्रायलवर हल्ला चढवला. काहीवेळापूर्वीच इराणने इस्रायलच्या (Israel) मध्य आणि दक्षिण भागात क्षेपणास्त्र सोडल्याची माहिती आहे. तेल अविव आणि जेरुसलेम या भागात स्फोट झाल्याची माहिती इस्रायली लष्कराकडून देण्यात आली. इराणच्या या हल्ल्यामुळे इस्रायलच्या अनेक भागांमध्ये सध्या धोक्याचे सायरन वाजत असून पुन्हा गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायल यांच्यात शस्त्रसंधी झाल्याची केलेली घोषणा कुचकामी ठरली आहे.
यानंतर आता अमेरिका काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल. अमेरिकेने यापूर्वी इराणच्या तीन आण्विक तळांवर संहारक अस्त्रांचा मारा करुन ते उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर इराण शरणागती पत्कारेल, असे अमेरिकेला वाटत होते. परंतु, इराणने प्रतिहल्ला करत अमेरिका आणि इस्रायलला चोख प्रत्युत्तर दिले होते. इराणने सोमवारी रात्री कतारमधील अमेरिकी सैन्याच्या तळावर क्षेपणास्त्रांचा मारा केला होता.
#BREAKING Israeli army says Iranian missiles fired at Israel 'short while ago' pic.twitter.com/iph5LIENIs
— AFP News Agency (@AFP) June 24, 2025
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धबंदीची घोषणा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 12 दिवसांच्या युद्धानंतर इराण-इस्रायल यांच्यात युद्धबंदी झाल्याची घोषणा केली होती. सकाळी साडेनऊपासून ही युद्धबंदी लागू होणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. इराणने काल कतार, सीरिया, इराकमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर इराणने क्षेपणास्त्र हल्लेही केले होते. त्यानंतर अमेरिकेने इराणशी वाटाघाटी आणि चर्चेला सुरुवात केली होती. त्यानंतर अमेरिकेनेही कोणतीही कारवाई न करण्याचं मान्य केलं. सीझफायरबाबत ट्रम्प आणि नेत्यानाहू यांच्या फोनवर चर्चाही झाली. हल्ले न करण्याची अट इराणने मान्य केल्यावर युद्धबंदीची घोषणा करण्यात आल्याचे ट्रम्प यांनी सांगितले होते.
मात्र, इराणने युद्धबंदीचा निर्णय अंतिम असल्याचा इन्कार केला होता. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले होते की, 'ज्यांना इराणी लोक आणि त्यांचा इतिहास माहित आहे त्यांना माहित आहे की इराणी राष्ट्र हे शरणागती पत्करणारे राष्ट्र नाही'. तर इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अरघची यांनी इस्रायलशी शस्त्रसंधी करण्याचा निर्णय अंतिम झाला नसल्याचे स्पष्ट केले होते.
आणखी वाचा
इराण अन् इस्त्रायलचं युद्ध थांबवण्यासाठी 'या' मुस्लिम देशाचा पुढाकार; नेमकं काय घडलं?


















