लष्करी अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर इराणचा पुन्हा मध्यवर्ती इस्त्रायलसह तेल अविव, जेरुसलेमध्ये हायपरसोनिक 'मिसाईलवर्षाव'
Iran launches a new wave of attacks on Israel: लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर इराणने संपूर्ण इस्त्रायलवर पुन्हा हायपरसोनिक मिसाईलचा मारा पुन्हा सुरु केला आहे.

Iran launches a new wave of attacks on Israel: इस्रायल आणि इराणमधील संघर्ष तीव्र होत असतानाच इस्रायल आणि इराणकडून हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहेत. इस्लामिक रिव्होल्यूशन गार्ड्स कॉर्प्स (IRGC) गुप्तचर युनिटचे प्रमुख मोहम्मद काझेमी मारले गेल्याची पुष्टी इराणने केली आहे. IRGC शी संबंधित तस्निम वृत्तसंस्था आणि इराणी सरकारी टीव्हीने म्हटले आहे की रविवारी इस्रायली हल्ल्यात काझेमी, त्यांचे उपाध्यक्ष हसन मोहाक आणि कमांडर मोहसेन बाकेरी यांचा मृत्यू झाला. यापूर्वी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, "मी तुम्हाला सांगू शकतो की आम्हाला त्यांचे मुख्य गुप्तचर अधिकारी आणि त्यांचे उपाध्यक्ष तेहरानमध्ये सापडले आहेत." अल जझीरा आणि बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार संपूर्ण इस्त्रायलमध्ये मिसाईल हल्ल्यानंतर धक्के जाणवत आहेत.
दरम्यान, लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर इराणने संपूर्ण इस्त्रायलवर पुन्हा हायपरसोनिक मिसाईलचा मारा पुन्हा सुरु केला आहे. या हल्ल्यात संपूर्ण इस्त्रायलमध्ये हादरे जाणवत आहेत. तेल अविव आणि जेरुसलेम पुन्हा टार्गेट करण्यात आलं असून आज पहाटेला आकाशात मिसाईल येऊन धडकताना दिसून आल्या.
इराणी हल्ल्यानंतर हैफा वीज प्रकल्पात आग
दरम्यान, अल जझीराने दिलेल्या वृत्तानुसार इराणच्या ताज्या मिसाईल हल्ल्यानंतर हैफामध्ये किमान दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत आणि तीन जण बेपत्ता आहेत. इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर हैफा बंदराच्या परिसरातील एका वीज प्रकल्पात आग लागली होती.द जेरुसलेम पोस्ट, चॅनल 12 आणि यनेट न्यूजच्या मते, इराणी हल्ल्यानंतर मध्य इस्रायलमध्ये किमान तीन जण ठार झाले आहेत. नवीन हल्ल्यांनंतर मध्य इस्रायलमध्ये झालेल्या जीवितहानी आणि नुकसान झालं आहे. उत्तर इस्रायलमध्ये, हैफा बंदर शहरातही हल्ला झाला आहे. दरम्यान, इस्रायली सैन्याने हल्ला रोखल्याचे व्हिडिओ फुटेज पाहिले आहेत. त्यानंतर दोन हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचे धक्के जाणवत आहेत.
इस्रायलींचा हल्ल्यांना पाठिंबा, पण नेतान्याहूंवर विश्वास नाही
इराणवरील चालू हल्ल्यांबद्दल इस्रायली जनतेच्या मनात संमिश्र भावना आहेत. हमास आणि हिजबुल्लाह यांना रसद आणि प्रोत्साहन देण्यामुळे इस्रायली लोक इराणला "प्रथम क्रमांकाचा शत्रू" मानत आहेत. म्हणूनच तेहरानविरुद्ध इस्रायलच्या युद्धाला सामान्य पाठिंबा "खूप मोठा" आहे, असल्याचे एका तज्ज्ञाने अल जझीराशी बोलताना सांगितले. दुसरीकडे, नेतान्याहू सरकारच्या बाबतीत फारसा विश्वास नाही. नेतान्याहू वैयक्तिक आणि राजकीय दोन्ही समस्यांनी ग्रासले आहेत.
इराणी हल्ल्यांनंतर इस्रायलमध्ये डझनभर जखमी
इस्रायलच्या मॅगेन डेव्हिड अॅडोम (एमडीए) सेवेने म्हटले आहे की इराणच्या ताज्या हल्ल्यांनंतर 29 जखमींना बाहेर काढण्यात आले आहे, त्यापैकी तिघांची प्रकृती सामान्य आहे. 26 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.
मध्य इस्रायलमध्ये किमान चार ठिकाणी हल्ला
मध्य इस्रायलवर झालेल्या ताज्या इराणी हल्ल्यांमध्ये किमान चार भागात हल्ला झाल्याचे वृत्त देत आहे. मध्य इस्रायलमध्ये किमान एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचे म्हटले आहे. तसेच, इस्रायलच्या Ynet न्यूजने मध्य इस्रायलमध्ये 12 लोक जखमी झाल्याचे वृत्त दिले आहे आणि त्या सर्वांना मध्यम किंवा सौम्य दुखापत झाली आहे. पेटाह टिक्वा शहरात आग लागल्याचेही वृत्त दिले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























