Iran Israel Ceasefire: इराण अन् इस्रायलचं युद्ध अखेर थांबलं; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धबंदीची घोषणा, नेमकं काय घडलं?
Iran Israel Ceasefire: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्त्रायलमधील युद्धबंदीची घोषणा केली आहे. आज (24 जून) सकाळी साडेनऊपासून युद्धबंदी लागू होणार आहे.

Donald Trump Announces Iran Israel Ceasefire: 12 दिवसांच्या युद्धानंतर इराण-इस्रायल युद्धबंदीची (Iran Israel Ceasefire) घोषणा झालीय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donal Trump) यांनी ही घोषणा केलीय. आज (24 जून) सकाळी साडेनऊपासून ही युद्धबंदी लागू होणार आहे. कतार आणि अमेरिकेने या युद्धबंदीसाठी पुढाकार घेतला.
अमेरिकेने या युद्धात उडी घेत इराणच्या आण्विक तळांवर हल्ले केल्यामुळे इराण खवळला होता. अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची भाषाही केली जात होती. त्यानुसार कतार, सीरिया, इराकमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर इराणने क्षेपणास्त्र हल्लेही केले. मात्र हे हल्ले केल्यानंतर इराणने व्हाईट हाऊसला शांती संदेश पाठवला. त्यानंतर अमेरिकेनेही कोणतीही कारवाई न करण्याचं मान्य केलं. सीझफायरबाबत ट्रम्प आणि नेत्यानाहू यांच्या फोनवर चर्चाही झाली. हल्ले न करण्याची अट इराणने मान्य केल्यावर युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे.
Trump announces "complete and total" ceasefire between Israel and Iran
— ANI Digital (@ani_digital) June 23, 2025
Read @ANI Story | https://t.co/6wlxoKeHtr#Trump #ceasefire #Israel #Iran #US pic.twitter.com/uZ4LH4aiDG
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, हे युद्ध अनेक वर्षे चालू शकले असते आणि संपूर्ण मध्य पूर्व नष्ट करू शकले असते, परंतु ते घडले नाही. ते संपवण्यासाठी दाखवलेल्या धाडस आणि शहाणपणाबद्दल मी इराण आणि इस्रायलचे अभिनंदन करतो, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. तसेच देव इराण, इस्रायल, अमेरिका, मध्य पूर्व आणि संपूर्ण जगाला आशीर्वाद देवो, असंही प्रार्थनाही डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.
इराणनेही युद्धबंदीच्या वृत्ताला पुष्टी दिली-
डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केल्यावर इराणनेही युद्धबंदीच्या वृत्ताला पुष्टी दिलीय. 13 जूनला इस्रायलने इराणवर हल्ले केल्यावर गेले 12 दिवस दोन्ही देश एकमेकांवर भयंकर प्रहार करत होते. तेल अवीवपासून तेहरानपर्यंत रोज प्रचंड हानीची माहिती समोर येत होती. इस्रायल आणि इराण दोघेही माघार घेत नव्हते. इराणला नमवण्यासाठी अमेरिकेलाही यात पडावं लागलं होतं. त्यामुळे चीन रशिया नाराज होत व्यापक युद्धाचे ढग जमा होऊ लागले होते.
आम्ही संयम दाखवला; इस्रायलकडून स्पष्टीकरण
इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही इराणविरुद्ध कठोर कारवाई करण्यास तयार आहोत, परंतु जर अमेरिका आणि आमच्या मित्र राष्ट्रांच्या प्रयत्नांमुळे संकट टाळता आले तर हा एक चांगला पर्याय आहे. आम्ही संयम दाखवला आहे. तथापि, इस्रायलने स्पष्ट केले की, जर युद्धबंदीचा भंग झाला तर आम्ही त्याला त्वरीत प्रत्युत्तर देऊ...
अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याचा निषेध कोणी-कोणी केला?
हमास -निषेध
सौदी अरेबिया - चिंता
कतर - चिंता
ओमान - निषेध
पाकिस्तान - निषेध
इराक - निषेध
युके - चिंता
युरोपिअन युनिअन - चिंता
युनायटेड नेशन्स - चिंता
चायना - निषेध
ऑस्ट्रेलिया - चिंता
मेक्सिको - चिंता
वेेनेझ्युएला - निषेध
क्युबा - निषेध
चिली - निषेध
12 दिवसांच्या युद्धानंतर इराण - इस्त्रायल युद्धबंदीची घोषणा, VIDEO:
संबंधित बातमी:
























