एक्स्प्लोर

भारताला इराणचा धक्का, चाबहार रेल्वे प्रकल्पातून बाहेर काढलं!

इराण आणि भारत यांच्यात चार वर्षांपूर्वी चाबहार रेल्वे प्रकल्पाबाबत करार झाला होता. मात्र आता इराणने या प्रकल्पातून भारताला वगळलं आहे. भारत आणि चीनमध्ये तणाव वाढलेला असतानाच इराणने हे पाऊल उचललं आहे.

नवी दिल्ली : इराणने चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला बाहेर काढलं आहे. भारताकडून निधी मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. 'द हिंदू'ने याबाबतचं वृत्त प्रकाशित केलं आहे. भारत आणि चीनमध्ये तणाव वाढलेला असतानाच इराणने हे पाऊल उचललं आहे. इराण आणि भारत यांच्यात चार वर्षांपूर्वी चाबहारहून अफगाणिस्तान सीमेवर जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग बनवण्यासंदर्भात करार झाला होता. आता इराणने हा प्रकल्प स्वत:च पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असून यावर कामही सुरु केलं आहे. 'द हिंदू'च्या वृत्तानुसार, भारताकडून या प्रकल्पासाठी निधी मिळण्यास विलंब होत आहे, परिणामी आम्ही स्वत:च यावर काम करण्यास सुरुवात केली आहे, असं इराणचं मत आहे. 628 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग बांधण्याचं काम मागील आठवड्यात सुरु झालं आहे. इराणचे वाहतूर शहरी विकास मंत्री मोहम्मद इस्लामी यांनी याचं उद्घाटन केलं. हा रेल्वे मार्ग सीमा पार करुन अफगाणिस्तानच्या जारांजपर्यंत जातो. इराणी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हा प्रकल्प मार्च 2022 पर्यंत पूर्ण केला जाईल. यासाठी आता इराणच्या राष्ट्रीय विकास निधीचा वापर केला जाईल. चार वर्षांपूर्वी भारत-इराण-अफगाणिस्तानमध्ये करार चार वर्षांपूर्वी जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचा दौरा केला होता. तेव्हा हा करार भारत-अफगाणिस्तान आणि इराणमध्ये झाला होता. तेहरानमध्ये इराणचे अध्यक्ष रुहाणी, अफगाणिस्तानचे अध्यक्ष घणी आणि आयआरसीओएन यांच्यात चाबहार रेल्वे मार्गाच्या योजनेबाबत करारावर स्वाक्षरी केली होती. इराणी रेल्वे मंत्रालयासोबत झालेल्या या रेल्वे मार्गाच्या निर्मितीच्या करारात भारताकडून इंडियन रेल्वेज कन्स्ट्रक्शन लिमिटेडचा (IRCON)सहभाग होता. चीन-इराण करार, 25 वर्षांपर्यंत 400 अब्ज डॉलरची गुंतवणूक दरम्यान इराण आणि चीनमध्ये 25 वर्षांच्या रणनीती करारावर चर्चा झाली आहे. सुमारे 400 अब्ज डॉलरचा करार असेल. मात्र इराणच्या संसद मजलिसकडून याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. या करारानुसार, चीन अतिशय कमी दरात पुढील 25 वर्षांपर्यंत इराणमधून तेल खरेदी करणार आहे. या मोबदल्यात चीन बँकिंग, दूरसंचार, बंदर, रेल्वे आणि वाहतूक इत्यादी सेवांमध्ये गुंतवणूक करणार आहे. भारत आणि अमेरिकेला झटका सध्या इराण आणि चीन या दोन्ही देशांचा अमेरिकेसोबत वाद सुरु आहे. आण्विक कार्यक्रमावरुन इराण आणि अमेरिके यांच्यात वाद आहे. तर ट्रम्प सरकारचे चीनसोबत अनेक मुद्द्यावर वाद आहेत. त्याचवेळी सीमेवरील तणावामुळे भारत आणि चीन यांच्यात संघर्ष सुरु असून सध्या दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे. त्यामुळे इराण-चीनमधील करार भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांसाठी झटका असल्याचं जाणकारांचं मत आहे. भारताने इरानच्या चाबहार बंदराच्या विकासावर अब्जावधी रुपये खर्च केले आहेत. अमेरिकेच्या दबावामुळे इराणसोबत भारताचं सध्या नातं नाजूक आहे. भारत आणि इराणमध्ये सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध आहेत. 1950 मध्ये दोन्ही देशांमध्ये राजकीय संबंधांची सुरुवात झाली. तेहरानमध्ये भारताच्या दूतावासाशिवाय बंदर अब्बास आणि जहेदानमध्ये कॉन्सूलेटही आहे. तर इराणचंही नवी दिल्लीतीली दूतावासाशिवाय मुंबई आणि हैदराबादमध्ये कॉन्सूलेट जनरल आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Fly dubai Incident Benjamin Netanyahu: जखमी होऊनही भारतीय वैमानिक निडरपणे भिडला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू कौतुक करत म्हणाले..
जखमी होऊनही भारतीय वैमानिक निडरपणे भिडला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू कौतुक करत म्हणाले..
Flydubai Incident : फ्लाय दुबईच्या विमानात ओमानच्या को-पायलटला भारतीय वंशाचा पायलट भिडला, 180 प्रवाशांचा जीव वाचवला 
फ्लाय दुबईच्या विमानात ओमानच्या को-पायलटला भारतीय वंशाचा पायलट भिडला, 180 प्रवाशांचा जीव वाचवला 
तब्बल 3 हजार कोटींच्या अंमली पदार्थांसह 5 पाकिस्तानींच्या मुसक्या आवळल्या; इराणी बोटीतून मुबंईत येताना लक्षद्वीपजवळ तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने पकडलं
तब्बल 3 हजार कोटींच्या अंमली पदार्थांसह 5 पाकिस्तानींच्या मुसक्या आवळल्या; इराणी बोटीतून मुबंईत येताना लक्षद्वीपजवळ तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने पकडलं
Plane Hijack: विमानात वाद अन् दाबला गेला हायजॅकिंगचा कोड! अलर्टने इस्रायल-सौदीत उडाली धावपळ, फ्लाय दुबईच्या विमानात नेमकं काय घडलं? तासाभराच्या थरारानंतर अखेर सत्य समोर
विमानात वाद अन् दाबला गेला हायजॅकिंगचा कोड! अलर्टने इस्रायल-सौदीत उडाली धावपळ, फ्लाय दुबईच्या विमानात नेमकं काय घडलं? तासाभराच्या थरारानंतर अखेर सत्य समोर

व्हिडीओ

Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Accident News: भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना
भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना
Pooja Birari Pink Nauvari Saree Look: 'गुलाबी साडी अन्...', बांदेकरांच्या सुनबाईंचा थाटच न्यारा, नऊवारी साडी अन् मराठमोळ्या साजातला अंदाजच निराळा, PHOTOs
'गुलाबी साडी अन्...', बांदेकरांच्या सुनबाईंचा थाटच न्यारा, नऊवारी साडी अन् मराठमोळ्या साजातला अंदाजच निराळा, PHOTOs
LPG Price Hike: सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; LPG सिलेंडर 62 रुपयांनी महागला, दिल्लीपासून मुंबईपर्यंत नवे दर लागू, तुमच्या शहरांतले दर काय?
सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; LPG सिलेंडर 62 रुपयांनी महागला, दिल्लीपासून मुंबईपर्यंत नवे दर लागू, तुमच्या शहरांतले दर काय?
Fly dubai Incident Benjamin Netanyahu: जखमी होऊनही भारतीय वैमानिक निडरपणे भिडला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू कौतुक करत म्हणाले..
जखमी होऊनही भारतीय वैमानिक निडरपणे भिडला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू कौतुक करत म्हणाले..
Thane Crime Pradeep Purnekar death and Sanjay Raut: हा सगळा मॉब घेऊन मिनाक्षी शिंदेंच्या घरी जाऊ का? संजय राऊतांच्या 'त्या' एका इशाऱ्यासरशी पोलीस सावध अन्...
हा सगळा मॉब घेऊन मिनाक्षी शिंदेंच्या घरी जाऊ का? संजय राऊतांच्या 'त्या' एका इशाऱ्यासरशी पोलीस सावध अन्...
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
Drishyam 3 Box Office Collection: 'दृश्यम 3' रिलीज आधीच सुस्साट, बॉक्स ऑफिसवर वादळ उठणार, अजय देवगणचा सिनेमा आतापर्यंतची ब्लॉकबस्टर कमाई करणार?
'दृश्यम 3' रिलीज आधीच सुस्साट, बॉक्स ऑफिसवर वादळ उठणार, अजय देवगणचा सिनेमा आतापर्यंतची ब्लॉकबस्टर कमाई करणार?
Embed widget