एक्स्प्लोर

Plane Hijack: विमानात वाद अन् दाबला गेला हायजॅकिंगचा कोड! अलर्टने इस्रायल-सौदीत उडाली धावपळ, फ्लाय दुबईच्या विमानात नेमकं काय घडलं? तासाभराच्या थरारानंतर अखेर सत्य समोर

Dubai Tel Aviv plane hijack : दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या एका प्रवासी विमानात अचानक खळबळ उडाली, जेव्हा विमानाने आपत्कालीन संकेत पाठवला. यानंतर विमानाने आपला मार्ग बदलण्यास सुरुवात केली.

Dubai Tel Aviv plane hijack : दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या एका प्रवासी विमानाने काही वेळापूर्वी सौदी अरेबियाच्या आकाशात उड्डाण करत असताना आपत्कालीन संकेत पाठवला, ज्यानंतर विमानाने आपला मार्ग बदलला. त्या वेळी विमानाच्या संरक्षणासाठी इस्रायली लढाऊ विमाने (फायटर जेट्स) देखील घटनास्थळी पोहोचली आणि विमानाला एस्कॉर्ट करून सौदी अरेबियाच्या विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. सुरुवातीला हे प्रकरण हायजॅकिंगचे (Dubai Tel Aviv plane hijack) असल्याचे मानले जात होते, परंतु सध्या दोन्ही वैमानिकांमध्ये झालेल्या वादामुळे परिस्थिती बिघडल्याचे समोर आले आहे.(Dubai Tel Aviv plane hijack)

फ्लाइट ट्रॅकिंगनुसार, 'फ्लायदुबई'च्या या विमानाने आधी '७७००' हा स्क्वॉक कोड पाठवला, जो आंतरराष्ट्रीय स्तरावर एखाद्या गंभीर आपत्कालीन परिस्थितीचा संकेत असतो. काही वेळानंतर विमानाने '७५००' हा कोड प्रसारित केला, ज्याचा वापर सामान्यतः विमान हायजॅक झाल्यास किंवा कोणत्याही बेकायदेशीर हस्तक्षेपाच्या वेळी केला जातो. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट्सनुसार, हे विमान शेवटच्या वेळी सौदी अरेबियातील तबूक विमानतळाजवळ पाहिले गेले होते.(Dubai Tel Aviv plane hijack)

Plane Hijack:  इस्रायली सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

या घटनेची माहिती मिळताच इस्रायली सुरक्षा यंत्रणा तात्काळ सक्रिय झाल्या. सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली हवाई दलाची लढाऊ विमाने या विमानाच्या दिशेने रवाना करण्यात आली होती. इस्रायली माध्यमांच्या वृत्तानुसार, घटनेनंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी तातडीची बैठकही घेतली होती, मात्र या प्रकरणाची अधिक चौकशी केली जात होती.

Plane Hijack: काय असतो इमर्जन्सी अलर्ट?

दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात बुधवारी त्यावेळेस प्रचंड गोंधळ उडाला, जेव्हा विमानाने आधी '७७००' हा इमर्जन्सी कोड आणि नंतर हायजॅकिंगची शक्यता दर्शवणारा '७५००' हा कोड प्रसारित केला. यानंतर विमानाने आपला मार्ग बदलून सौदी अरेबियाच्या दिशेने वळण घेतले.

Plane Hijack: नेमकं काय घडलं?

हे विमान दुबईवरून तेल अवीवकडे निघालेलं होतं. विमानाचा सौदी अरेबियात सुरक्षित लँडिंग देखील झाल्याचं समजत आहे. त्या विमानातील गोंधळाच्या वृत्तामुळे आता काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. सुरुवातीला ही जी माहिती समोर आलेली आहे, त्यानुसार वैमानिकांमध्ये वाद झाल्याचं समजतंय आणि त्यानंतर आता ही माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. या संदर्भामध्ये डिस्ट्रेस सिग्नल पाठवण्यात आलेला होता या विमानाकडून आणि या डिस्ट्रेस सिग्नलसह फ्लाईट हायजॅकिंगच्या संदर्भातील जो कोड असतो, तो कोड देखील पाठवण्यात आला होता ग्राउंड कम्युनिकेशनला. परंतु त्यानंतर निश्चितच सगळीकडे सध्या असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आणि अशा स्वरूपाचा डिस्ट्रेस सिग्नल आल्यानंतर चिंतेचं वातावरण होतं. परंतु आता ही फ्लाईट पुन्हा संपर्कात आलेली आहे आणि जी चर्चा होती किंवा जी शक्यता वर्तवली गेली सुरुवातीला, की ही फ्लाईट कदाचित हायजॅक केलेली असू शकते का, किंवा या फ्लाईटमध्ये काही अडचणीचा प्रसंग आलेला आहे का, तर तसं काही घडलेलं नसून ही फ्लाईट, या संदर्भात जो डिस्ट्रेस सिग्नल पाठवण्यात आलेला होता, तो डिस्ट्रेस सिग्नल कदाचित वैमानिकांच्या मध्ये झालेल्या वादामुळे झाला असावा. 

कारण सगळ्यात पहिल्यांदा जो डिस्ट्रेस सिग्नल आला, तो काही प्रवाशांमध्येही वाद झाला त्या विमानामध्ये आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर हा डिस्ट्रेस सिग्नल पाठवण्यात आलेला होता. यामध्ये कुठल्याही प्रकारे हायजॅकिंग झालेलं आहे फ्लाईटचं असं नाही आणि परंतु तो कोड त्यावेळेस पाठवला गेला ग्राउंड कम्युनिकेशनसोबत आणि त्यामुळे या संदर्भातील एक गैरसमज आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

एकूण १८० जे प्रवास करणारे प्रवासी होते, त्यांच्यापैकी १५० हे इस्रायली प्रवासी असल्याची शक्यता होती आणि त्या सगळ्यामध्ये अचानक जेव्हा काही विमान प्रवासा दरम्यान वैमानिकांमध्ये वाद झाला किंवा त्या प्रवाशांमध्ये काही वाद झाला, आणि या सगळ्यामध्ये जे ग्राउंड कम्युनिकेशन असतं, त्या ग्राउंड कम्युनिकेशनमध्ये जो हायजॅकिंगचा प्रयत्न होतो फ्लाईट हायजॅक करत असताना, तर त्या प्रयत्नाच्या वेळेस जो डिफेन्स कोड पाठवला जातो, तो कोड विमानातून ग्राउंड कम्युनिकेशनला पाठवण्यात आलेला होता आणि त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं की कदाचित ही फ्लाईट हायजॅक केली जाऊ शकते का, किंवा अशा स्वरूपाचा डिस्ट्रेस सिग्नल आला तर त्यामुळे नेमकं विमानामध्ये काय घडलेलं आहे? परंतु आता ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे की अशा स्वरूपाचा कोणताही हायजॅकिंगचा प्रयत्न झालेला नव्हता. 

जो तिथे काही वाद झाला विमानामध्ये, तो प्रवाशांमध्ये झाला, वैमानिकांमध्ये झाला आणि त्यानंतर जो डिफेन्स कोड खाली पाठवण्यात आला, तो डिस्ट्रेस कोड पाठवत असताना चुकून हायजॅकिंगशी संबंधित एक कोड पाठवला गेलेला होता. त्या फ्लाईटमध्ये कुठल्याही प्रकारचा हायजॅकिंगचा प्रयत्न झालेला नाही किंवा कोणत्याही स्वरूपाचा हायजॅकिंगचा अटेम्प्ट सुद्धा या विमानामध्ये झालेला नाही, हे आता स्पष्ट झालेलं आहे. इस्रायली पंतप्रधानांच्या प्रवक्त्यांनी सुद्धा हे स्पष्ट केलंय की या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा जो इन्सिडंट घडलेला, तो इन्सिडंट हायजॅकिंगशी संबंधित नाहीये. जे काही इतर वाद झाला प्रवाशांमध्ये, वैमानिकांमध्ये, त्यामुळे घडलेला हा सगळा गडबडीचा प्रकार.

अशा स्वरूपाचा डिस्ट्रेस सिग्नल आल्यानंतर आणि इमर्जन्सी कोड आल्यानंतर निश्चितच चिंतेचं वातावरण होतं आणि त्यामुळे तातडीने लँडिंगच्या दृष्टीने म्हणून सौदी अरेबियाच्या दिशेने हे विमान वळवलं गेलं. परंतु त्यानंतर आता हे स्पष्ट होतंय की कोणत्याही प्रकारचा असा प्रकार तिथे घडलेला नाही. जो कोड जारी करण्यात आलेला होता, तो चुकून कोड जारी करण्यात आलेला होता. त्यामुळे जे सर्वसाधारणपणे जो कोड असतो की ७७०० हा सर्वसामान्य इमर्जन्सीसाठी दिला जाणारा सिग्नल आहे, तर त्यानंतर मग तो ७५०० मध्ये बदलला गेला. ७५०० मध्ये बदलल्याचा अर्थ असा होतो की कोणत्याही प्रकारचा इलिगल हस्तक्षेप हा विमानामध्ये केला जातोय आणि त्यावेळी अशा स्वरूपाचा कोड पाठवला जातो. त्यामुळे पायलटच्या कॉकपीटमध्ये काही इलिगल हस्तक्षेप, अनऑथराईज्ड ॲक्सेस करण्याचा प्रयत्न होतोय असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे त्याचा अर्थ हायजॅक करण्याचा प्रयत्न होतोय का फ्लाईटचा, असाही घेतला जाऊ शकतो आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा ७७००, जो सर्वसामान्य इमर्जन्सीसाठी पाठवला जाणारा कोड आहे, तोच कोड त्या विमानाच्या कम्युनिकेशनमधून आला होता.

 त्यानंतर मग ही गोष्ट स्पष्ट झाली की काहीतरी गडबड आहे. मग त्यावेळी जेव्हा सौदी अरेबियाच्या दिशेने हे विमान वळवलं गेलं, परंतु नंतर हे स्पष्ट झालं की कोणत्याही प्रकारे ही फ्लाईट हायजॅकचा प्रयत्न झालेला नव्हता. सध्या हे फ्लाईट दुबईमध्ये उतरलेलं आहे आणि अशा स्वरूपाचा जो एक गैरसमज निर्माण झाला, तो गैरसमज त्या विमानामध्ये घडलेल्या काही भांडणामुळे, वादामुळे म्हणून त्या पायलटने त्यावेळी हा अशा स्वरूपाचा सिग्नल खाली पाठवलेला होता. यामध्ये इस्राईलच्या पंतप्रधानांच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली या सगळ्या संदर्भात, ती देखील समोर आलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की फ्लाय दुबई विमानाचं अपहरण झालेलं नाहीये.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 2nd Test Day-1 : 110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Chhatrapati Sambhajinagar : वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
Vasai Crime News : वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
IND vs SL : पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! आशिया कप स्पर्धेतून बाहेर, रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs NZ 2nd Test Day-1 : 110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Chhatrapati Sambhajinagar : वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
Vasai Crime News : वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
IND vs SL : पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! आशिया कप स्पर्धेतून बाहेर, रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
Parliament Session : 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
Packaged Food Label : पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
Embed widget