एक्स्प्लोर

International Mountain Day 2020: आज आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस, असा आहे त्याचा इतिहास आणि महत्व

International Mountain Day 2020: पर्वतांच्या महत्वाविषयी जागरुकता वाढवणं, त्याचं संवर्धन आणि विकासावर लक्ष केंद्रीत करणं या उद्देशानं दरवर्षी 11 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस साजरा केला जातो.

International Mountain Day: जगभरातील 15 टक्के लोकसंख्या ही पर्वतीय प्रदेशात राहते. तसेच हा प्रदेश विविध प्राणी आणि निसर्गसंपदेनं संपन्न आहे. केवळ यासाठीच या प्रदेशाचं जतन करणं आवश्यक नाही तर इतर भागातील लोकसंख्येसाठीही पर्वतीय प्रदेश महत्वाचा आहे. त्यामुळे पर्वतांच्या संवर्धनासाठी आणि त्याच्या विषयी जागरुकता वाढवण्यासाठी 11 डिसेंबर हा दिवस 'आतंरराष्ट्रीय पर्वत दिवस' म्हणून साजरा केला जातो.

'पर्वतीय जैवविविधता' या वर्षीची थीम या वर्षी पर्वत दिवस साजरा करताना संयुक्त राष्ट्रसंघटनेनं 'पर्वतीय जैवविविधता' अशी थीम तयार केली आहे. पर्वतीय प्रदेशातील संपन्न जैवविविधता, त्याच्या समोरील आव्हानं आणि त्याचं संवर्धन यावर जागरुकता वाढवण्यासाठी जगातील राष्ट्रांनी प्रयत्न करावेत असं आवाहन संयुक्त राष्ट्रसंघटनेनं केलं आहे.

संयुक्त राष्ट्रसंघटनेमध्ये 1992 साली 'अजेंडा 21' या 21 व्या शतकातील जैवविविधतेचे संवर्धनासंबंधी महत्वपूर्ण आराखड्याला मंजुरी देण्याता आली. त्यामध्ये 13 वा मुद्दा हा "Managing Fragile Ecosystems: Sustainable Mountain Development" होता. यामध्ये पर्वतीय जैवविविधतेच्या शाश्वत विकासावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं होतं. पर्वतांचं पर्यावरणातील महत्व लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघटनेनं 2002 साल हे 'आंतरराष्ट्रीय पर्वत वर्ष' या स्वरुपात साजरं केलं आणि 11 डिसेंबर 2003 पासून 'आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस' साजरा करण्याचा निर्णय घेतला.

मानवी जीवनात पर्वतांचे महत्व पर्यावरणावर आणि लोकांच्या जीवनावर पर्वतांचा प्रभाव मोठा असतो. या प्रदेशाची एक वेगळी निसर्गसंपदा आणि जैवविविधता असते. निसर्गाच्या जलचक्रामध्ये पर्वत महत्वाची भूमिका बजावतात. उन्हाळ्याच्या काळात पर्वतीय बर्फ वितळतो आणि परिणामी पर्वतीय नद्या बारमाही वाहतात. कृषी आणि लोकाना आवश्यक पाण्याचा पुरवठा त्यामुळे शक्य होतो. भारतातील गंगा, यमुना सहित महत्वाच्या नद्यांचा उगम हिमालयाच्या पर्वत रांगात आहे. त्यामुळे भारतातील अर्ध्यापेक्षा अधिक लोकसंख्येला त्याचा फायदा होतोय. जगातील प्रमुख नद्यांचा उगमही पर्वतीय प्रदेशात झाला आहे.

पर्वतांमधून येणाऱ्या पाण्यापासून हायड्रोइलेक्ट्रीक प्रोजेक्ट उभारुन त्यापासून वीजनिर्मिती केली जाते. विकसनशील देशांमध्ये पर्वतीय प्रदेश इंधनाचा प्रमुख स्तोत आहे. तसेच पर्वतीय प्रदेशांतील झाडांचे लाकूड हे घरबांधणीसाठी वापरलं जातं.

वातावरणातील बदल, चुकीच्या पध्दतीनं केली जाणारी शेती, या प्रदेशातील खणीकाम यामुळे पर्वतीय जैवविविधतेला धोका वाढत आहे.

महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Embed widget