एक्स्प्लोर
भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा ऑस्ट्रेलियात जल्लोष
देशभरात 15 ऑगस्टची तयारीची लगबग सुरु असताना, तिकडे ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये नुकताच ध्वजारोहण सोहळा पार पडला.

मेलबर्न : स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची उत्सुकता जितकी देशातील भारतीयांना असते तितकीच ती परदेशातील भारतीयांनादेखील असते. देशभरात 15 ऑगस्टची तयारीची लगबग सुरु असताना, तिकडे ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये नुकताच ध्वजारोहण सोहळा पार पडला.
मेलबर्नमध्ये अनेक कार्यक्रम आठवड्याच्या शेवटी पार पडतात. त्यामुळे मेलबर्नमध्येही 15 ऑगस्टच्या कार्यक्रमांसाठीची सुरुवात शहरातल्या फेडरेशन स्क्वेअरवर ध्वजारोहण करुन झाली.
अभिनेत्री राणी मुखर्जीच्या हस्ते ध्वजारोहण झालं आणि यानंतर मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टिव्हला सुरुवात झाली. मराठमोळ्या ढोल ताशांच्या गजरात मेलबर्नमधील फेडरेशन स्क्वेअर दुमदुमून गेला होता.
पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Advertisement
Advertisement


















