एक्स्प्लोर

India Response to shahbaz sharif UNGA Speech : लाज शिल्लक नाही, पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो; भारताने संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांचा बुरखा टराटरा फाडला!

India Response to shahbaz sharif UNGA Speech : संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या भाषणानंतर भारताने कडक शब्दांत प्रत्युत्तर दिलंय.

India Response to shahbaz sharif UNGA Speech : संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांच्या भाषणानंतर भारताने (India) कडक शब्दांत प्रत्युत्तर दिलं असून, इस्लामाबादवर दहशतवादाचं महिमामंडन करणं आणि तथ्यांची तोडमोड केल्याचा आरोप केला आहे. शरीफ यांच्या भाषणानंतर संयुक्त राष्ट्रामध्ये भारताच्या स्थायी मिशनमधील प्रथम सचिव पेटल गहलोत यांनी "जवाब देण्याच्या अधिकाराचा" वापर करत पाकिस्तानवर कठोर टीका केली. पाकिस्तानकडे लाज शिल्लक नाही, पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो, असे म्हणत त्यांनी जोरदार पलटवार केलाय.

पेटल गहलोत म्हणाल्या, या सभेत पाकिस्तानच्या पंतप्रधानांची बिनबुडाची नौटंकी पाहायला मिळाली. त्यांनी पुन्हा एकदा दहशतवादाचं महिमामंडन केलं, जे त्यांच्या परराष्ट्र धोरणाचं केंद्र आहे. मात्र कोणतंही नाटक किंवा कितीही मोठं खोटं, सत्य लपवू शकत नाही. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 80 व्या सत्रात बोलताना पंतप्रधान शरीफ यांनी 'ऑपरेशन सिंदूर' चा उल्लेख केला आणि दावा केला की, मे महिन्यात चार दिवस चाललेल्या संघर्षात "सात भारतीय लढाऊ विमाने आम्ही उद्ध्वस्त केली. परंतु, भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह यांनी मागील महिन्यात सांगितले होते की, या ऑपरेशनदरम्यान पाच पाकिस्तानी लढाऊ विमानं आणि एक मोठं विमान भारतीय वायूदलाने पाडलं.

हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताकडून दहशतवादी तळ लक्ष्य

25 एप्रिल 2025 रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानने द रेझिस्टन्स फ्रंटला जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटकांवर केलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या जबाबदारीतून मुक्त केले होते, याची आठवण गहलोत यांनी करून दिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 7 मे रोजी सुरू केलेल्या कारवाईदरम्यान भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले, असे त्यांनी म्हटले. 

10 मे रोजी आम्हाला लढाई थांबवण्याचे आवाहन

त्या पुढे म्हणाल्या, ऑपरेशन सिंदूर दरम्यान बहावलपूर आणि मुरीदके येथील दहशतवादी अड्ड्यांवर भारतीय सैन्याने मारलेल्या दहशतवाद्यांचे असंख्य फोटो आम्ही पाहिले आहे. वरिष्ठ पाकिस्तानी लष्करी अधिकारी सार्वजनिकरित्या कुख्यात दहशतवाद्यांचा गौरव करतात आणि त्यांना श्रद्धांजली वाहतात, तेव्हा राजवटीच्या प्रवृत्तींबद्दल काही शंका असू शकते का? पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतासोबतच्या अलिकडच्या संघर्षाची विचित्र माहिती देखील दिली. या बाबतीत रेकॉर्ड स्पष्ट आहे. 9 मे पर्यंत पाकिस्तान भारतावर आणखी हल्ले करण्याची धमकी देत ​​होता. पण 10 मे रोजी पाकिस्तानी लष्कराने थेट आम्हाला लढाई थांबवण्याचे आवाहन केले," असे पलटवार त्यांनी पाकिस्तानवर केला. 

ओसामा बिन लादेनला आश्रय दिला

गहलोत पुढे म्हणाल्या, दहशतवाद पसरवण्याची परंपरा असलेल्या देशाला हास्यास्पद गोष्टी पसरवण्यात अजिबात लाज वाटत नाही. पाकिस्तानने तब्बल एक दशक ओसामा बिन लादेनला आश्रय दिला होता, तेव्हाही तो दहशतवादविरोधी युद्धात सहभागी असल्याचा केवळ दिखावा करत होता. त्यांच्या मंत्र्यांनी अलीकडेच मान्य केलं आहे की, त्यांनी अनेक वर्ष दहशतवादी छावण्या चालवल्या. त्यामुळे आता पुन्हा एकदा हे दुटप्पी धोरण सुरू आहे. यावेळी थेट त्यांच्या पंतप्रधानांच्या पातळीवरून हे दुटप्पी धोरण सुरु असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.  

आणखी वाचा

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दोस्त म्हणत भारताला दणक्याची मालिका सुरुच; फार्मा कंपन्यांवर 100 टक्के टॅरिफ, शेअर बाजारातही धडकी भरली

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena UBT-MNS Manifesto BMC Election 2026: 100 युनिटपर्यंत मोफत वीज, 700 स्के.फू.घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ; मुंबईकरांसाठी ठाकरेंच्या 10 मोठ्या घोषणा
100 युनिटपर्यंत मोफत वीज, 700 स्के.फू.घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ; मुंबईकरांसाठी ठाकरेंच्या 10 मोठ्या घोषणा
Mumbai Crime News: 'माहेरुन सोनं घेऊन ये, घराचा EMI तूच भर'; मुंबईत महिला पोलिसाचा सासरच्या मंडळींकडून छळ, नवऱ्याकडून मारहाण
'माहेरुन सोनं घेऊन ये, घराचा EMI तूच भर'; मुंबईत महिला पोलिसाचा सासरच्या मंडळींकडून छळ, नवऱ्याकडून मारहाण
हवामानाची लहर बदलली! दक्षिणेत पाऊस- उत्तरेत थंडीची लाट, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान कसे?
हवामानाची लहर बदलली! दक्षिणेत पाऊस- उत्तरेत थंडीची लाट, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान कसे?
Amit Thackeray In Shivsena Bhavan: अमित ठाकरेंचं एक विधान अन् संपूर्ण शिवसेना भवनात टाळ्या; आदित्य ठाकरेंसमोर काय घडलं?, VIDEO
अमित ठाकरेंचं एक विधान अन् संपूर्ण शिवसेना भवनात टाळ्या; आदित्य ठाकरेंसमोर काय घडलं?, VIDEO

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena UBT-MNS Manifesto BMC Election 2026: 100 युनिटपर्यंत मोफत वीज, 700 स्के.फू.घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ; मुंबईकरांसाठी ठाकरेंच्या 10 मोठ्या घोषणा
100 युनिटपर्यंत मोफत वीज, 700 स्के.फू.घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ; मुंबईकरांसाठी ठाकरेंच्या 10 मोठ्या घोषणा
Mumbai Crime News: 'माहेरुन सोनं घेऊन ये, घराचा EMI तूच भर'; मुंबईत महिला पोलिसाचा सासरच्या मंडळींकडून छळ, नवऱ्याकडून मारहाण
'माहेरुन सोनं घेऊन ये, घराचा EMI तूच भर'; मुंबईत महिला पोलिसाचा सासरच्या मंडळींकडून छळ, नवऱ्याकडून मारहाण
हवामानाची लहर बदलली! दक्षिणेत पाऊस- उत्तरेत थंडीची लाट, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान कसे?
हवामानाची लहर बदलली! दक्षिणेत पाऊस- उत्तरेत थंडीची लाट, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान कसे?
Amit Thackeray In Shivsena Bhavan: अमित ठाकरेंचं एक विधान अन् संपूर्ण शिवसेना भवनात टाळ्या; आदित्य ठाकरेंसमोर काय घडलं?, VIDEO
अमित ठाकरेंचं एक विधान अन् संपूर्ण शिवसेना भवनात टाळ्या; आदित्य ठाकरेंसमोर काय घडलं?, VIDEO
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
99th All India Marathi Literary Conference: काळे कपडे घातल्याने पोलिसांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवलेल्या लेखकाला अडवलं, साहित्य संमेलनात नेमकं काय घडलं?
काळे कपडे घातल्याने पोलिसांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवलेल्या लेखकाला अडवलं, साहित्य संमेलनात नेमकं काय घडलं?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
Embed widget