एक्स्प्लोर

पहलगाम हल्ल्यावर मौन बाळगल्यामुळे भारताचा एससीओच्या निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एससीओ बैठकीत संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार देत पहलगाम हल्ल्यावर दस्तऐवजाच्या मौनावर आक्षेप घेतला, ज्यामध्ये २६ लोकांचा मृत्यू झाला होता.

भारताने एससीओच्या (शांघाय कॅार्पोरेशन ऑर्गनायझेशन ) संरक्षण मंत्र्‍यांच्या बैठकीत संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. ही बैठक चीन येथील किंगदाओ येथे गुरुवारी भरली होती ज्यामध्ये भारताच्या वतीने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी झाले होते.

संयुक्त निवेदनात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा समावेश नव्हता, परंतु बलुचिस्तानमधील घटनेचा समावेश केला गेला ज्यामुळे या प्रदेशातील अशांततेसाठी अप्रत्यक्षपणे भारताला जबाबदार मानण्यात आले. भारताने यावर नाराजी व्यक्त करत  निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. ज्यामुळे भारताच्या ठाम भूमिका समोर येत पाकिस्तानच्या दहशतवादावरील प्रायोजकतेवर कडक संदेश गेला आहे.

बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याची पद्धत भारतात यापूर्वी झालेल्या लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी हल्ल्यांसारखीच होती. सीमापार दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी आपल्या अधिकाराचा वापर करून, भारताने 7 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूर राबवले.

काही देश सीमापार दहशतवादाला आपले धोरण मानतात आणि दहशतवाद्यांना आश्रय देतात आणि नंतर हेच ते नाकारतात. अशा दुटप्पी निकषांना जागा नसावी. त्यांना हे समजून घ्यावे लागेल की दहशतवादाची केंद्रे आता सुरक्षित नाहीत. आणि एससीओने अशा देशांवर टीका करण्यास मागेपुढे पाहू नये.

बैठकीस पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ देखील उपस्थित होते. परंतु राजनाथ सिंह यांनी त्यांना भेटण्याचे टाळले.

पहलगामचा मुद्दा वगळण्यामागे चीनचे अध्यक्षपद कारण?

पहलगाम हल्ला वगळण्यामागे पाकिस्तानचा प्रभाव असल्याचे दिसून येते, कारण त्याचा जवळचा मित्र चीन सध्या एससीओचा अध्यक्ष आहे. भारताने बलुचिस्तानबाबत पाकिस्तानचे आरोप सातत्याने फेटाळून लावले आहेत आणि निराधार आरोप करण्याऐवजी दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे, असे आवाहन इस्लामाबादला केले आहे. 

काय आहे एससीओ?

शांघाय कॅार्पोरेशन ऑर्गनायजेशनची स्थापना २००१ मध्ये करण्यात आली. यामध्ये एससीओ सहकार्याद्वारे प्रादेशिक स्थिरतेला प्रोत्साहन देते आणि सध्या त्याचे १० सदस्य देश आहेत: बेलारूस, चीन, भारत, इराण, कझाकस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान. या शिखर परिषदेत रशिया, पाकिस्तान आणि चीनसह सदस्य राष्ट्रांना प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षेवर चर्चा करण्यासाठी एकत्र आणले जाते.

महत्त्वाच्या बातम्या

उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Imran Khan : इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  
इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Embed widget