एक्स्प्लोर

IRGC seized vessel : मोठी बातमी, भारताकडे येणारं जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत जप्त, IRGC ची कारवाई, जहाज इराणकडे घेऊन गेले  

IRGC seized vessel : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अद्याप थांबलेला नाही यामुळं होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणाव कमी झालेला नाही.

IRGC seized vessel नवी दिल्ली: इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स यांनी होर्मुझची सामुद्रधुनी पार करण्याचा प्रयत्न करणारी दोन जहाजं जप्त केली आहेत. ही जहाजं जप्त करुन इराणकडे नेली जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोन पैकी एक जहाज भारताकडे येणार होतं. भारताकडे येणारं जहाज दुबईतून निघालं होतं, ज्यावर लिबेरियाचा ध्वज लावलेला होता. 

एएफपीच्या रिपोर्टनुसार आयआरजीसीच्या नौदलानं सकाळी होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये नियमांचा भंग करणाऱ्या दोन जहाजांना ताब्यत घेतलं आहे. आयआरजीसीनं दोन जहाजं जप्त केली असून ती इराणकडे नेली जात आहेत. 

सागरी वाहतुकीच्या क्षेत्रातील वेबसाईटनुसार इराणच्या ताब्यात असलेल्या जहाजांची नावं MSC-FRANCESCA आणि EPAMINONDAS अशी आहेत. जहाज ट्रॅकिंग  डेटानुसार, इराणकडून जप्त करण्यात आलेलं जहाज एपामिनोंडास हे गुजरातच्या मुंद्रा पोर्टकडे निघालं होतं. जहाज दुबईतून निघालं होतं आणि ते गुजरातमध्ये पोहोचणार होतं. मात्र, आयआरजीसीनं जहाजावर हल्ला करत ते ताब्यात घेतलं आहे.  भारताकडे जाणाऱ्या जहाजाच्या जप्तीमुळं सप्लाय चेन संदर्भातील भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे. 

इराणच्या आयआरजीसीनं पश्चिम आशियातील अमेरिकन तेल कंपन्या आणि तेलविहिरींवर हल्ले करण्याची धमकी दिली आहे. इराणच्या तस्नीम वृत्तसंस्थेच्या हवाल्यानं ही धमकी देण्यात आली आहे.  इराणकडून धमकी देण्यात आली की अमेरिकेकडून त्यांच्यापायाभूत सुविधांवर हल्ले करण्यात आल्यास पश्चिम आशियातील अमेरिकेच्या जितक्या तेल विहिरी आहेत त्या उद्धवस्त केल्या जातील. इराणनं स्पष्ट केलं की अमेरिकेची मालकी असलेल्या तेल कंपन्यांवर हल्ले केले जाऊ शकतात.

इराणने यापूर्वी इराणच्या सागरी हद्दीत तीन जहाजांवर जोरदार गोळीबार केला होता. तीन मालवहातूक जहाजांवर गोळीबार करण्यात आला होता. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी असलेल्या जहाजावर आयआरजीसीच्या गनबोटमधून अचानक गोळीबार सुरु झाला होता. 

अमेरिका आणि इराण यांच्यातील दुसऱ्या टप्प्यातील चर्चा पाकिस्तानमध्ये होणार होती, ती अद्याप होऊ शकलेली नाही. ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी दोन आठवडे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं पश्चिम आशियात तणाव वाढलेला आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष कधी संपणार?

अमेरिका आणि इस्त्रायल यांच्याकडून 28 फेब्रुवारीला इराणवर हल्ले करण्यात आले होते. त्यानंतर इराणनं देखील विविध देशांवर हल्ले केले होते. अमेरिका आणि इस्त्रायल विरुद्ध युद्ध सुरु केल्यानंतर लवकर संपेल असं वाटलं होतं. मात्र, अमेरिका आणि इस्त्रायलला इराणनं नेते गमावून देखील उत्तरं दिलं आहे. आता अमेरिका आणि इराण संघर्ष कधी थांबणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Embed widget