एक्स्प्लोर

इम्रान खानच्या शपथविधीला आमीर, कपिल देव, गावस्कर जाणार?

अभिनेता आमीर खान, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव आणि सुनिल गावस्कर यांना इम्रान खान यांनी शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं आहे.

मुंबई : पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या शपथविधी सोहळ्याला शेजारी देशातील दिग्गजांना निमंत्रित केलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच नामवंत क्रिकेटपटू, अभिनेत्यांना सोहळ्याचं आमंत्रण असल्याची माहिती आहे. अभिनेता आमीर खान, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव आणि सुनिल गावस्कर यांना इम्रान खान यांनी शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं आहे. 1992 मध्ये इम्रान खान यांच्या नेतृत्वात पाकिस्तानी क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला होता. त्यावर्षी कपिल देव भारतीय क्रिकेट संघात खेळत होते. त्यामुळे कपिल देव यांच्याशी इम्रान यांचं खास नातं आहे. पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’ या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. इम्रान खान 11 ऑगस्टला पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतील. “इम्रान खान यांच्या शपथविधीला नरेंद्र मोदी यांच्यासह सार्क (SAARC) देशांच्या प्रमुखांनाही बोलावलं जाण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींनी इम्रान खान यांचं विजयाबद्दल फोनद्वारे अभिनंदन केलं. हे एक चांगलं पाऊल आहे,” असं तहरीक-ए-इन्साफच्या एका नेत्याने म्हटलं होतं. नरेंद्र मोदी यांनी 2014 साली आपल्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला सार्क देशांच्या प्रमुखांना निमंत्रित केलं होतं. मोदींच्या शपथविधीला पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ हेदेखील उपस्थित राहिले होते. पाकिस्तान निवडणुकीत काय झालं? पाकिस्तानात 25 जुलैला 270 जागांसाठी मतदान झालं. या निवडणुकीत इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाला सर्वाधिक 116 जागा मिळाल्या. इम्रान यांनी स्वत: पाच जागांवर निवडणूक लढवली. या पाचही जागांवर त्यांचा विजय झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget