एक्स्प्लोर
पहिल्या कॅबिनेट मिटिंगमध्येच इम्रान खान यांचा नवाज शरीफना दणका
पाकिस्तानच्या पहिल्या मंत्रिमंडळात नवाज शरीफ यांच्याभोवती चर्चा फिरत राहिली. मात्र माजी लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांच्यावर कोणतीच चर्चा झाली नाही.
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या नवनिर्वाचित मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत नवे पंतप्रधान इम्रान खान यांनी माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम यांना दणका दिला आहे. नवाज शरीफ आणि मरियम या दोघांचीही नावं ‘एक्झिट कंट्रोल लिस्ट’मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळाने घेतला. त्यामुळे आता शरीफ आणि मरियम पाकिस्तान सोडून कुठेही जाऊ शकत नाहीत.
पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी या निर्णयाबाबत बोलताना म्हटले, “इम्रान खान यांच्या नेतृत्त्वात आयोजित मंत्रिमंडळ बैठकीत पाकिस्तानसमोरील आर्थिक आव्हाने आणि त्यासाठीचे उपाय यावर चर्चा झाली. तसेच, भ्रष्टाचारविरोधी अभियानाअंतर्गतच शरीफ आणि मरियम यांची नावं ‘एक्झिट कंट्रोल लिस्ट’मध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.”
नवाज शरीफ यांची दोन मुलं हसन, हुसैन आणि माजी अर्थमंत्री इसहाक डार यांच्या विरोधात रेड वॉरंट जारी करुन, त्यांना पाकिस्तानात आणावं, असे आदेश नव्या मंत्रिमंडळाने गृह मंत्रालयाला दिले आहेत. पाकिस्तानने या तिघांनाही ‘फरार’ घोषित केले आहे. तसेच, शरीफ कुटुंबीयांच्या ‘एव्हनफिल्ड’ संपत्तीबाबत ब्रिटन सरकराशी संपर्क करण्याचे आदेशही मंत्रिमंडळाने कायदा मंत्रालयाला दिले आहेत.
पाकिस्तानच्या पहिल्या मंत्रिमंडळात नवाज शरीफ यांच्याभोवती चर्चा फिरत राहिली. मात्र माजी लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांच्यावर कोणतीच चर्चा झाली नाही.
दरम्यान, आगामी तीन महिने तरी पंतप्रधान इम्रान खान परदेश दौऱ्यावर जाणार नाहीत. यावेळी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करतील, असेही या मंत्रिमंडळ बैठकीत ठरल्याचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement