एक्स्प्लोर
VIDEO : भुकेल्या वैमानिकाचं McDonalds समोर हेलिकॉप्टर लँडिंग

सिडनी, ऑस्ट्रेलिया : भूक लागल्यावर कोण काय करेल सांगू शकत नाही. ऑस्ट्रेलियात एका भुकेल्या वैमानिकानं चक्क मॅकडोनल्डच्या शेजारी इमर्जन्सी लँडिग केलं. भूक अनावर झाल्याने त्याने मॅकडी समोरच्या मोकळ्या जागेवर हेलिकॉप्टर उतरवल्याचं समोर आलं आहे. डॅन नावाच्या या वैमानिकानं चक्क सिडनीतल्या एका मॅकडोनल्ड आऊटलेटशेजारी हेलिकॉप्टर उतरवलं आणि आपलं पार्सल घेऊन निघाला. त्याच्या या कृत्यानं सगळेच अचंबित झाले. त्याचं हे कृत्य बेकायदेशीर असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. या प्रकरणी ऑस्ट्रेलियन नागरी हवाई उड्डाण मंत्र्यांनांही प्रश्न विचारण्यात आले. मात्र जमीन मालकाच्या परवानगीनंतरच हे हेलिकॉप्टर लँड करण्यात आलं असल्यामुळे ते तांत्रिकदृष्ट्या बेकायदेशीर नसल्याचं हवाई उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केलं. पाहा व्हिडिओ :
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक























