Haiti President, Jovenel Moïse Assassinated: हैतीचे अध्यक्ष ज्वनेल मोईस यांची हत्या; पंतप्रधानांकडून दुजोरा
हैतीचे अध्यक्ष ज्वनेल मोइसे यांची हत्या करण्यात आली आहे.
हैतीचे अध्यक्ष ज्वनेल मोइसे यांची हत्या करण्यात आली आहे. हैतीचे पंतप्रधानांनी या बातमीला दुजोरा दिला असल्याची माहिती वृत्तसंस्था एएफपीने (AFP) दिली आहे.
#BREAKING Haiti President Jovenel Moise assassinated: interim PM pic.twitter.com/b6rFriYfjv
— AFP News Agency (@AFP) July 7, 2021
पोर्ट-ऑ-प्रिन्सकडून प्राथमिक माहिती अद्याप बाहेर येत आहे. दरम्यान, पत्रकार मायकेल डीबर्ट यांनी एक निवेदन शेअर करुन कॅरिबियन देशाच्या राष्ट्राध्यक्षांची कमांडोच्या गटाने त्यांच्या खासगी निवासस्थानी हत्या केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
The president of Haiti, @moisejovenel, has been assassinated by a team of commandos who attacked his home in the hills above Port-au-Prince. Pray for #Haiti and its people. pic.twitter.com/SiWNIwtxm8
— Michael Deibert (@michaelcdeibert) July 7, 2021
अंतरिम पंतप्रधान क्लाउड जोसेफ यांनी बुधवारी पहाटे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अज्ञात व्यक्तींच्या गटाने मध्यरात्री हैतीचे अध्यक्ष ज्वनेल मोइसे यांची खासगी निवासस्थानी हल्ला करुन त्यांना गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
वृत्तानुसार, अज्ञात व्यक्तींच्या गटाने राष्ट्राध्यक्षांची हत्या केली, त्यातील काही स्पॅनिश बोलत होते. बुधवारी रात्री पहाटे एकच्या सुमारास ही घटना घडली. असोसिएटेड प्रेसच्या म्हणण्यानुसार हैतीच्या फर्स्ट लेडीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एपीने ट्विट केले की हैतीच्या राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्यात आली असून प्रथम महिला रुग्णालयात दाखल आहे.