एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

अमेरिका आणि चीनमध्ये ट्रेड वॉर, सोनं महागणार

येत्या काळात सोन्याचा दर 32 हजार किंवा त्याहून अधिक महाग होण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या व्यापारी युद्धामुळे हा परिणाम होण्याची शक्यता अनेक जाणकार व्यक्त करत आहेत.

मुंबई : येत्या काळात सोन्याचा दर 32 हजार किंवा त्याहून अधिक महाग होण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या व्यापारी युद्धामुळे हा परिणाम होण्याची शक्यता अनेक जाणकार व्यक्त करत आहेत. सध्या अमेरिका आणि चीनमध्ये ट्रेड वॉर सुरु आहे. चीनने अवैध मार्गांनी अमेरिकेची बौद्धिक संपदा हस्तगत केल्याचा आरोप करत, डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून होणाऱ्या आयातीवर हे शुल्क लावले आहे. चीनमधून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर 60 अब्ज डॉलरचे शुल्क लावण्याचे निर्देश व्यापार मंत्रालयाला ट्रम्प यांनी दिले आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांत व्यापार युद्ध भडकण्याची चिन्हे आहे. शिवाय, या निर्णयाचा परिणाम जागतिक बाजारपेठेवरही पडण्याची शक्यता आहे. या ट्रेड वॉरमुळे सध्या करेन्सी आणि कमोडिटी मार्केटमध्ये मोठा चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात सोन्याचे दर कमालीचे वाढण्याची शक्यता आहे. पीपी ज्वेलर्सचे उपसंचालक पवन गुप्ता यांच्या मते, शेअर बाजारावर या ट्रेड वॉरचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक मोठे गुंतवणूकदार शेअर बाजाराऐवजी सोन्यात आपली गुंतवणूक करतील, अशी चिन्हं आहेत. दुसरीकडे कच्च्या तेलाच्या दरातही चढउतार पाहायला मिळत आहेत. कारण, सौदी अरेबियाने यापूर्वीच ओपेकच्या उत्पादनात कपातीचे संकेत दिले होते. त्यानंतर गेल्या दोन आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमतीत 10 टक्क्यांची वाढ झाली होती. पण त्यातच आता नव्याने उद्भवलेल्या ट्रेड वॉरच्या संकटामुळे 2019 मध्ये ओपेककडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात कपात होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अमेरिका इराणवर आर्थिक निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे जर हे निर्बंध लागू झाल्यास कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात आणखी कपात होण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोललेUdayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखलSharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेशManoj Jarange On Reservation : आंतरवाली सराटीत पुन्हा होणार सामूहिक आमरण उपोषण, जरांगेंची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Embed widget