भारत पाकिस्तानच्या वाढत्या तणावाची जगभरात चर्चा; जी-7 राष्ट्रांसह बड्या राष्ट्रांच्या प्रतिक्रीया, कोण काय म्हणालं?
जगभरात बहुतांश देशांमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या वाढत्या तणावाची चर्चा आहे . जगभरातील बलाढ्य नेते हा तळाव कमी करण्याचे आवाहन दोन्ही देशांना करत आहेत . कोणत्या देशाची प्रतिक्रिया काय?

India Pakistan War: पहलगामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत झालेल्या हवाई हल्ल्यात पाकिस्तानच्या दहशतवादी तळ्यांना भारताने बेचिराख केलं .या हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानी भारताच्या नागरी वस्त्यांवर लक्ष्य करत 8 व 9 मे रोजी केलेल्या हल्ल्यांना भारताच्या सुरक्षा दलांनी आणि हवाई संरक्षण यंत्रणेने हाणून पाडले .भारताच्या या धाडसी कारवाईनंतर दोन्ही देशांमधील वाढत्या तणावावर जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे .चीन असो अमेरिका असो किंवा युरोपीय देश किंवा आखाती देश असोत ; जगभरात बहुतांश देशांमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या वाढत्या तणावाची चर्चा आहे . जगभरातील बलाढ्य नेते हा तळाव कमी करण्याचे आवाहन दोन्ही देशांना करत आहेत . कोणत्या देशाची प्रतिक्रिया काय? (Global Reaction)
चीनचे म्हणणे काय ?
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा शेजारी असणारा चीन भारत पाकिस्तान तणावावर बारकाईने लक्ष ठेवून आहे .दोन्ही देशांमध्ये असलेल्या तणावावर सातत्याने चीनकडून प्रतिक्रिया येत आहेत .अलीकडच्याच एका टिप्पणीत ,चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दोन्ही देशांच्या तणावावर चिंता व्यक्त केली आहे .त्यांनी सांगितले , " आम्ही दोन्ही बाजूंना शांतता आणि स्थैर्यासाठी सहकार्य करण्याचे तसेच शांतता आणि संयम बाळगण्याचे,शांततापूर्ण मार्गाने राजकीय तोडगा काढण्याच्या मार्गावर परतण्याचे आवाहन करतो.तणाव आणखी वाढू शकेल अशी कोणतीही कृती टाळण्याचे आवाहनही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केले आहे .भारत आणि पाकिस्तान या दोघांच्याही मूलभूत हितासाठी स्थिर आणि शांततापूर्ण प्रदेशासाठी हे आवश्यक असल्याचा चीनने म्हटले आहे .आंतरराष्ट्रीय समुदायालाही हेच हवे आहे .त्यामुळे चीन या दिशेने रचनात्मक भूमिका बजाऊ इच्छितो असं चीनच्या प्रवक्त्यांनी सांगितलं .
जी 7 राष्ट्रांची प्रतिक्रिया
भारत आणि पाकिस्तान मधील वाढत्या तणावावर अमेरिका आणि युरोपीय देशांच्या जी7 राष्ट्रांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे .कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम, अमेरिका आणि युरोपियन युनियन सदस्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आणि उच्च प्रतिनिधींनी दोन्ही देशांना तणाव तातडीने कमी करण्याचा आवाहन केले आहे .
" शनिवारी g7 परराष्ट्र मंत्र्यांनी जारी केलेल्या निवेदनात 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो .भारत आणि पाकिस्तान या दोघांनाही जास्तीत जास्त संयम बाळगण्याचे आवाहन करतो .दोन्ही देशांमध्ये झालेल्या लष्करी कारवायांमध्ये वाढ झाल्यामुळे प्रादेशिक स्थिरतेला गंभीर धोका झाल्याचं यांनी निवेदनात म्हटलंय . आम्हाला दोन्ही बाजूंच्या नागरिकांच्या सुरक्षेची खूप काळजी आहे .हा तणाव त्वरित कमी करण्याचे आम्ही दोन्ही देशांना आवाहन करतो .दोन्ही देशांमध्ये शांतता आणि थेट संवाद साधण्यासाठी प्रोत्साहित करतो .आम्ही घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि जलद आणि कायमस्वरूपी राजनैतिक तोडग्यासाठी आमचा पाठिंबा असेल असेही या निवेदनात म्हटलं आहे .
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिया काय म्हणाले?
भारत-पाक संघर्षात अमेरिकेची परस्परविरोधी वक्तव्ये दिसून येत आहे. दोन्ही देशांनी तणाव कमी करावा असं आवाहन अमेरिकेने केलं आहे. मार्को रुबिया यांनी भारत-पाकला चर्चेसाठी मदत करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसेच पाकच्या लष्करप्रमुखांना आज अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी फोन केला. यावेळी ठोस चर्चा करुन संभाव्य धोका टाळण्याचं आवाहन परराष्ट्रमंत्री मार्को रुबिया यांनी केलं. रशिया, जपानने भारताला पाठिंबा जाहीर केला आहे. तर चीन आणि तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिली आहे. अमेरिका देखील भारताच्या बाजूने असल्याचं जाहीर केलं. तसेच भारत आणि पाकिस्तानच्या तणावात आमचा काय संबंध म्हणणाऱ्या अमेरिकेने 24 तासांत भूमिका बदलल्याचे दिसून येत आहे.
सौदी अरेबियाची प्रतिक्रिया काय ?
आखाती प्रदेशातील आघाडीचा देश मानला जाणारा सौदी अरेबिया या देशानेही भारत आणि पाकिस्तान मधील वाढतच आणावावर चिंता व्यक्त केली आहे .शनिवारी जारी केलेल्या निवेदनात सौदी अरेबियाने म्हटले की ,भारत आणि पाकिस्तान मधील तणाव कमी करण्याचा लष्करी संघर्ष संपविण्याचा सर्व मुद्दे आणि वादसंवाद राजनैतिक मुत्सद्यगिरीने सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत .सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक संक्षिप्त निवेदन जारी करून दोन्ही देशांना तणाव कमी करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे .या निवेदनात म्हटलं " सौदी अरेबियाच्या नेतृत्वाच्या विनंतीवरून परराष्ट्रमंत्री अब्देल जुबैर यांनी 8 आणि 9 मे रोजी भारत आणि पाकिस्तानचा दौरा केला .ही भेट दोन्ही बाजूंमधील तणाव कमी करण्यासाठी आणि संवादाद्वारे वाद सोडवण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या सौदी अरेबियाच्या प्रयत्नांचा एक भाग होती . दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सौदीचे परराष्ट्रमंत्री गुरुवारी अचानक भारताला भेट देऊन गेले .भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी या संपूर्ण विषयावर त्यांनी चर्चा केली .शुक्रवारी पाकिस्तानातही ते जाऊन आले .
इजिप्तने काय म्हटले?
भारत आणि पाकिस्तानमधील तणावावर अरब देशांपैकीच एक असलेल्या इजिप्तची ही प्रतिक्रिया आली आहे .भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी आणखी तणाव वाढवू नये असे आवाहन इजिप्त चा परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनातून करण्यात आले .इजिप्तने भारत आणि पाकिस्तानला जास्तीत जास्त संयम बाळगण्याचे आणि राजनैतिक मार्गांनी चर्चा करण्याचा आवाहन केले आहे .दोन्ही देशांमधील नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी शांततापूर्ण उपायांचा अवलंब करण्याच्या महत्त्वावरही या निवेदनात भर देण्यात आला.
तुर्कस्तानचे म्हणणे काय?
तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचं ट्विटर) वरून एक पोस्ट करत पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी भारत-पाकिस्तानदरम्यान सुरू असलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे उद्भवणाऱ्या धोक्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. एर्दोगान यांनी म्हटले आहे की, "आम्हाला काळजी वाटते की या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव थेट संघर्षात परिवर्तित होऊ शकतो, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे प्राण जाऊ शकतात. या हल्ल्यांमध्ये प्राण गमावलेल्या आपल्या बांधवांवर दया करण्यासाठी मी अल्लाहकडे प्रार्थना करतो आणि मी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बंधूभावाच्या लोकांना आणि पाकिस्तानला माझ्या संवेदना व्यक्त करतो." अलीकडच्या काळात तुर्की पाकिस्तानला शस्त्रास्त्र, ड्रोन आणि तांत्रिक मदत देत असल्याचे अनेक अहवालांमधून स्पष्ट झाले आहे.पाकिस्तानच्या वतीने बोलताना तुर्कीचे अध्यक्ष त्यांच्या पोस्टमध्ये पुढे म्हणाले की, 'जम्मू आणि काश्मीरमधील भयानक दहशतवादी हल्ल्याची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याचा पाकिस्तानचा प्रस्ताव आम्हाला योग्य वाटतो.' काही लोक आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु तुर्की तणाव कमी करण्याच्या आणि संवादासाठी मार्ग उघडण्याच्या बाजूने आहेत.
हेही वाचा:
























