Ghana Explosion : घानामध्ये भीषण स्फोट; 17 ठार, 59 जखमी
घाना : पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारसायकल आणि स्फोटके वाहून नेणारा ट्रक यांच्यात धडक झाल्यानंतर घानामध्ये (Ghana) गुरुवारी मोठा स्फोट झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
![Ghana Explosion : घानामध्ये भीषण स्फोट; 17 ठार, 59 जखमी ghana explosion 17 dead and 59 injured in explosion caused by accident of Truck carrying explosives Ghana Explosion : घानामध्ये भीषण स्फोट; 17 ठार, 59 जखमी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/21/90e93495bf4fcb0e56757f09752892b4_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ghana Explosion : घाना (Ghana) देशामध्ये झालेल्या भीषण स्फोटात (Exlposion) 17 जणांचा मृत्यू झाला आहे तर, 59 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, घानामध्ये गुरुवारी मोटारसायकल आणि स्फोटके वाहून नेणारा ट्रक यांच्यात धडक झाल्यानंतर मोठा स्फोट झाला. या भीषण अपघातात 17 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. स्फोटामुळे पश्चिम घानामधील एपिएट हे छोटे शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे सांगण्यात येत आहे.
परिसरात काम करणाऱ्या आणि स्फोटाचा आवाज ऐकणाऱ्या लोकांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार की, स्फोटामुळे अनेक इमारती कोसळल्या. यामुळे अनेक लोक आणि प्राणी ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतेक पीडितांना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांच्या निवेदनात म्हटले आहे की, आपत्कालीन सेवा कर्मचारी घटनास्थळी सक्रिय आहेत. लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले जात आहे.
पोलिसांनी घाना राष्ट्रीय अग्निशमन सेवा, एनएडीएमओ आणि रुग्णवाहिका सेवेसह आरोग्य कर्मचाऱ्यांना परिस्थिती हाताळण्याचे निर्देश दिले आहेत. लोकांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी जवळच्या शहरात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. एपिएटची लोकसंख्या सुमारे 10 हजार आहे. येथील बहुतांश लोक शेतकरी आणि खाण कामगार आहेत. लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- वडिलांच्या संपत्तीवर चुलत भावांपेक्षा मुलींचा अधिकार जास्त; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
- पंतप्रधान मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते, जो बायडेन आणि बोरिस जॉन्सन यांना टाकलं मागे
- China Artificial Moon : सूर्यानंतर आता चंद्र देखील मेड इन चायना; चीननं तयार केला कृत्रिम चंद्र
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)