एक्स्प्लोर
जगातील सर्वात उंच बुर्ज खलिफामध्ये भारतीयाचे 22 फ्लॅट
दुबई : जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या 'बुर्ज खलिफा'मध्ये जॉर्ज व्ही नेरियापाराम्बिल या भारतीय व्यावसायिकाचे तब्बल 22 फ्लॅट असल्याचं समोर आलं आहे. एका स्थानिक वृत्तपत्राने रविवारी ही बातमी दिली आहे.
या भारतीय व्यावसायिकाने मेकॅनिक म्हणून सुरुवात केली होती. सध्या हा व्यावसायिक जीईओ नावाची कंपनी स्थापन करुन वातानुकूलन उद्योगात आपला जम बसवतो आहे.
"मी स्वप्न पाहणारा माणूस आहे, त्यामुळे मी स्वप्न पाहणे कधीही थांबवणार नाही. जर मला पटणाऱ्या किंमतीत अजून फ्लॅट मिळाले तर मी तेही विकत घेईन," असं या व्यावसायिकाने खलीज टाईम्स या वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं.
केरळमध्ये जन्मलेल्या नेरियापाराम्बिल यांनी एका नातेवाईकाने बुर्ज खलिफावरुन मस्करी केल्यावर फ्लॅट खरेदी करण्यास सुरुवात केली. 822 मीटर उंचीच्या या इमारतीमध्ये 900 फ्लॅट आहेत. यापैकी 22 फ्लॅट या भारतीय व्यावसायिकाचे आहेत. सध्या त्याने 5 फ्लॅट भाड्याने दिले आहेत, तर उरलेल्या फ्लॅटसाठी त्याने भाडेकरुंचा शोध चालवला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement