एक्स्प्लोर

Remi Lucidi Death : 68 मजली टॉवरवरून पडून प्रसिद्ध स्टंटमॅनचा मृत्यू; तासाभरापूर्वीच टाकलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Remi Lucidi Death : लुसिडी ट्रेगंटर टॉवर कॉम्प्लेक्समध्ये स्टंट करण्यासाठी गेला होता. तो टॉवरवर चढत असताना वरच्या मजल्यावरील पेंटहाऊसच्या बाहेर अडकला.

Remi Lucidi Death : गगनचुंबी इमारतींवर स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रेमी लुसिडी (Remi Lucidi) या स्टंटमॅनचा (Stuntman) हाँगकाँगमध्ये 68 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. रेमी लुसिडीने मृत्यूच्या एक तास आधी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लुसिडी ट्रेगंटर टॉवर कॉम्प्लेक्समध्ये स्टंट करण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी टॉवरवर चढत असताना त्याचा पाय घसरला. आणि रेमी लुसिडीला जागीच मृत घोषित केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टॉवरवर चढत असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

खोटं बोलून इमारतीत प्रवेश केला

हाँगकाँगच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही दुर्घटना काल (30. जुलै) रोजी सायंकाळी 6 वाजता घडली. रेमी लुसिडीला अनेकांनी इमारतीवर जाताना पाहिले होते. टॉवरमध्ये प्रवेश करत असताना त्याला गेटवरील सुरक्षा रक्षकाने अडवले होते. मात्र, सुरक्षा रक्षकाशी खोटं बोलून त्याने टॉवरमध्ये प्रवेश घेतला. त्याने सांगितले की, तो 40 व्या मजल्यावर आपल्या मित्राला भेटण्यासाठी आला आहे. मात्र, संबंधित मित्राने ओळख न दाखवल्यामुळे रेमी लुसिटी खोटं बोलत आहे हे सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आले. त्यानंतर, सुरक्षा रक्षकांनी त्याला पुढे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत लुसिडी लिफ्टमध्ये शिरला होता.

अपार्टमेंटच्या खिडकीतून मागितली होती मदत 

सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेमी लुसीडी 49 व्या मजल्यावर येताना आणि नंतर इमारतीच्या वरच्या पायऱ्या चढताना दिसला. तो संध्याकाळी 7:38 वाजता कॉम्प्लेक्सच्या पेंटहाऊसच्या खिडकीवर मदतीसाठी हात ठोठावताना दिसला. ज्यामुळे तिथे काम करणारी मोलकरीण घाबरली. तिला पाहून तोही घाबरला आणि त्याचा पाय घसरला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लुसिडी पेंटहाऊसच्या बाहेर अडकला होता आणि मदतीचा हात मागत होता. 

स्टंटचे व्हिडीओ पोलिसांना सापडले

पोलिसांना घटनास्थळी लुसिडीचा कॅमेरा सापडला. या कॅमेऱ्यात लुसिडीने आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी स्टंट केले त्याचे अनेक व्हिडीओ आहेत. पोलिसांनी अद्याप मृत्यूचे अधिकृत कारण जाहीर केलेले नाही. दरम्यान, लुसिडीशी संभाषण केल्याचा दावा करणाऱ्या एका कामगाराने सांगितले की, 'जेव्हा मी त्यांना विचारले की कुठे जात आहे, तेव्हा त्यांनी मला सांगितले की, ते डोंगरावर चढणार आहेत.' त्यांच्या मृत्यूच्या काही वेळापूर्वी, त्यांनी हाँगकाँगच्या आकाशाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मात्र, या दुर्देवी घटनेचा तपास अजून पोलिस करत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या :

Death Penalty : सिंगापूरमध्ये 20 वर्षांत पहिल्यांदाच महिलेला फाशी; वाचा फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या सारीदेवीचा गुन्हा

महत्त्वाच्या बातम्या

मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
प्रत्येक नागरिकाला मिळणार 26000 रुपये, 'या' देशाचा महत्वपूर्ण निर्णय, आर्थिक वाढीचा थेट सामान्य लोकांना फायदा
प्रत्येक नागरिकाला मिळणार 26000 रुपये, 'या' देशाचा महत्वपूर्ण निर्णय, आर्थिक वाढीचा थेट सामान्य लोकांना फायदा
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget