एक्स्प्लोर
प्रशिक्षकांसह फुटबॉल संघ अकरा दिवसांपासून गुहेत अडकून
या सर्वांना बाहेर काढण्यासाठी आता खास प्रशिक्षण दिलं जात आहे. 12 लहान मुले आणि त्यांचा 25 वर्षीय प्रशिक्षक असे एकूण तेरा जण या गुहेमध्ये अडकले आहेत.
मुंबई : थायलंडमधल्या गुहेत बेपत्ता झालेल्या फुटबॉल संघाचा शोध लागला असला तरी या फुटबॉलपटूंना बाहेर काढणं अजूनही शक्य झालेलं नाही. या सर्वांना बाहेर काढण्यासाठी आता खास प्रशिक्षण दिलं जात आहे. 12 लहान मुले आणि त्यांचा 25 वर्षीय प्रशिक्षक असे एकूण तेरा जण या गुहेमध्ये अडकले आहेत.
या मुलांना आता पोहण्याचं आणि पाण्यात डुबकी मारण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे. अकरा दिवसांपासून ही मुले गुहेत अडकून पडली आहेत. या मुलांपर्यंत सर्व वैद्यकीय मदत पोहोचवण्यात आली असून त्यांना अन्नाचाही पुरवठा केला जात आहे. पण त्यांना बाहेर आणण्यासाठी आता युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
संपर्क साधण्यासाठी फोन लाईन
गुहेत फोन लाईन टाकण्यात आली आहे, जेणेकरुन मुलांना नातेवाईकांशी संपर्क साधता येईल आणि त्यांचं मनोबल खचणार नाही.
मुलांना आता पोहण्याचं आणि पाण्यात श्वास घेण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे.
बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु
सर्वांना एकाच वेळी बाहेर आणता येणार नाही. त्यांची प्रकृती ठिक असेल आणि शंभर टक्के फिट असतील, तरच त्यांना बाहेर आणता येऊ शकतं, असं चिआंग राय प्रांताचे राज्यपाल नारोंगसक ओसातानाकोर्न यांनी बुधवारी सांगितलं होतं. मानसिकदृष्ट्या सर्व जण तयार आहेत का याचा आढावा दररोज घेतला जात आहे, त्यानंतरच त्यांना बाहेर काढण्याची मोहिम हाती घेतली जाऊ शकते, असंही ते म्हणाले.
मुलं गुहेत कसे गेले?
11 ते 16 वर्षीय वयोगटातील खेळाडू आणि त्यांचे 25 वर्षीय प्रशिक्षक 23 जून रोजी फुटबॉलचा सामना झाल्यानंतर उत्तरी चिआंग राय प्रांतात थाम लुआंग नांग नोन गुहा पाहण्यासाठी गेले होते. सर्व जण या गुहेत गेल्यानंतर मुसळधार पावसाने पाणी भरलं आणि बाहेर येण्याचा रस्ता हा कठीण आहे. मुलं अडकल्याची माहिती अगोदर कुणालाही नव्हती. नंतर त्यांचा शोध घेण्यात आला असता सर्व जण गुहेत अडकले असल्याचं समोर आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement