एक्स्प्लोर

Fitness Trainer Death : जीम प्रेमींनो, सावधान! 210 किलो वजन उचलण्याच्या प्रयत्नात मोडली मान, प्रसिद्ध फिटनेस ट्रेनरचा जागीच मृत्यू

Indonesia Fitness Trainer Death : जस्टिन विकी (Justyn Vicky) हा अनेकांसाठी फिटनेस गुरु होता. मात्र, 210 किलो वजन उचलण्याच्या प्रयत्नात त्याची मान मोडली, यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Fitness Trainer Death in Indonesia : इंडोनेशियामध्ये (Indonesia) 33 वर्षीय प्रसिद्ध फिटनेस ट्रेनचा (Fitness Trainer) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. फिटनेस ट्रेनर (Gym Trainer) जस्टिन विकी (Justyn Vicky) बारबेल उचलण्याचा प्रयत्न करत असताना त्याची मान मोडल्याने त्याचा मृत्यू झाला. न्यूज एशिया चॅनलच्या रिपोर्टनुसार, 15 जुलै रोजी हा अपघात झाला.  जस्टिन विकी इंडोनेशियातील बाली येथील जिममध्ये व्यायाम करत होता, त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती आहे.

210 किलो वजन उचलण्याचा प्रयत्नात मोडली मान 

मीडिया रिपोर्टनुसार, फिटनेस इन्फ्लुएंसर जस्टिन विकी 210 किलो वजनी बारबेल उचलण्याचा प्रयत्न करत असताना तो त्याच्यावर अंगावर पडला आणि त्याची मान मोडली. या अपघाताशी संबंधित एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जस्टिन विकी खांद्यावर बारबेल घेऊन स्क्वॅट प्रेस करत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. (Indonesia Fitness Trainer Death)

प्रसिद्ध फिटनेस ट्रेनरचा जागीच मृत्यू

33 वर्षीय जस्टिन विकी (Justyn Vicky) फिटनेस इन्फ्लुएंसर म्हणून काम करत होता. जस्टिन फक्त फिटनेस तज्ज्ञ नाही, तर तो अनेकांसाठी प्रेरणास्थान होता. अनेक जणांचा तो फिटनेस गुरु होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, जस्टिन विकी पॅराडाईज बाली जिममध्ये खांद्यावर बारबेल घेऊन स्क्वॅट प्रेस करताना दिसत आहे. चॅनल न्यूज एशियाने दिलेल्या वृत्तानुसार, स्क्वॅटमध्ये गेल्यानंतर तो सरळ उभा राहू शकत नाही असे दिसते.

नक्की काय घडलं?

न्यूज एशियाने रिपोर्टनुसार, जस्टिन विकी 210 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न करत होता. जिममध्ये खांद्यावर बारबेल घेऊन स्क्वॅट प्रेस करताना त्याच्या तोल गेला आणि बारबेलचं वजन मानेवर पडलं आणि तो बसलेल्या स्थितीतच खाली पडला. बारबेलचं वजन मानेवर पडल्याने त्याची मान मोडली. जस्टिन विकीच्या स्पॉटरने त्याचा तोल गमावल्याचे दिसते आणि घटनेदरम्यान तो त्याच्यासोबत मागे पडताना दिसतो. जस्टिन वेटलिफ्टिंग करत असताना त्याला मागच्या बाजूने वजन उचलण्यास मदत करायला व्यक्ती होती. पण, काही कळण्याच्या आतच हा सर्व प्रकार घडला. अपघातामुळे त्याची मान तुटली आणि त्याच्या हृदय आणि फुफ्फुसांना जोडणार्‍या महत्वाच्या मज्जातंतूंना गंभीर दुखापत झाली आणि यातच त्याचा मृत्यू झाला.

संबंधित इतर बातम्या : 

Viral Gym Trainer : पांढरी दाढी-पांढरे केस, डब्ल्यूडब्ल्यूईच्या सुपरस्टारसारखा फिटनेस, सोशल मीडियावर सगळ्यांना घाम फोडणारा हा व्यक्ती आहेत तरी कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे नियम टीव्हीवर येऊद्या, लोकांना कळू द्या, छगन भुजबळांनी संभ्रम टाळण्यासाठी सरकारला कृती कार्यक्रम दिला
लाडक्या बहीण योजनेतील 'त्या' बहिणींकडून पैसे परत घेण्याचा उपदव्याप नको, छगन भुजबळांचा सरकारला सल्ला
Varsha Bungalow: वर्षा बंगल्यात काळी जादू, रेड्यांची पुरलेली शिंगं; संजय राऊतांचा स्फोटक दावा
वर्षा बंगल्यावर खड्डा खणून बळी दिलेल्या रेड्यांची शिंगं का पुरली? संजय राऊतांचा धक्कादायक दावा
राज्याच्या कॅबिनेट बैठकीत 3 महत्वाचे निर्णय; पुणे अन् सातारा जिल्ह्याला थेट लाभ, अभय योजनेसही मुदतवाढ
राज्याच्या कॅबिनेट बैठकीत 3 महत्वाचे निर्णय; पुणे अन् सातारा जिल्ह्याला थेट लाभ, अभय योजनेसही मुदतवाढ
अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; आता बँकेत पैसे येणार नाहीत
अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; आता बँकेत पैसे येणार नाहीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania: डीबीटीच्या यादीतून वगळून खरेदीचं टेंडर,  दुप्पट दराने  खरेदी,  मुंडेंवर गंभीर आरोपIndrajeet Sawant : महाराज आग्र्याहून सुटताना Rahul Solapurkar तिथे होता का? : इंद्रजीत सावंतABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 04 February 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्सAmbernath Girl Murder : प्रेमप्रकरण ते हत्या,अंबरनाथ रेल्वेस्थानकाजवळ काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे नियम टीव्हीवर येऊद्या, लोकांना कळू द्या, छगन भुजबळांनी संभ्रम टाळण्यासाठी सरकारला कृती कार्यक्रम दिला
लाडक्या बहीण योजनेतील 'त्या' बहिणींकडून पैसे परत घेण्याचा उपदव्याप नको, छगन भुजबळांचा सरकारला सल्ला
Varsha Bungalow: वर्षा बंगल्यात काळी जादू, रेड्यांची पुरलेली शिंगं; संजय राऊतांचा स्फोटक दावा
वर्षा बंगल्यावर खड्डा खणून बळी दिलेल्या रेड्यांची शिंगं का पुरली? संजय राऊतांचा धक्कादायक दावा
राज्याच्या कॅबिनेट बैठकीत 3 महत्वाचे निर्णय; पुणे अन् सातारा जिल्ह्याला थेट लाभ, अभय योजनेसही मुदतवाढ
राज्याच्या कॅबिनेट बैठकीत 3 महत्वाचे निर्णय; पुणे अन् सातारा जिल्ह्याला थेट लाभ, अभय योजनेसही मुदतवाढ
अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; आता बँकेत पैसे येणार नाहीत
अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; आता बँकेत पैसे येणार नाहीत
मुंबई महापालिकेचे 74 हजार कोटींचं बजेट सादर, भांडवली उत्पन्न वाढलं, 10 टक्के खर्च आरोग्यावर,आयुक्त भूषण गगराणी काय म्हणाले?
मुंबई महापालिकेचा 74 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर, 10 टक्के खर्च आरोग्यावर : भूषण गगराणी
'त्या' पोलीस कुटुंबीयांच्या वारसास 7.5 लाखांची मदत; विशेष बाब म्हणून अजित पवारांनी घेतली निर्णय
'त्या' पोलीस कुटुंबीयांच्या वारसास 7.5 लाखांची मदत; विशेष बाब म्हणून अजित पवारांनी घेतली निर्णय
Mumbai News: मुंबईच्या झोपडपट्टीतील दुकानदारांना पालिकेचा झटका, गाळेधारकांना कर भरावा लागणार, पालिकेच्या बजेटमध्ये घोषणा
मुंबईच्या झोपडपट्टीतील दुकानदारांना पालिकेचा झटका, गाळेधारकांना कर भरावा लागणार, पालिकेच्या बजेटमध्ये घोषणा
Sandeep Kshirsagar: 'मंत्री असल्यानं धनंजय मुंडेंना संरक्षण', संदीप क्षीरसागराचा मोठा आरोप, म्हणाले, 'वाल्मिक मोठा नाही, त्याला ..'
'मंत्री असल्यानं धनंजय मुंडेंना संरक्षण', संदीप क्षीरसागराचा मोठा आरोप, म्हणाले, 'वाल्मिक मोठा नाही, त्याला ..'
Embed widget