एक्स्प्लोर

पश्चिम आफ्रिकेत कोरोनाप्रमाणेच संसर्गजन्य Marburg virus चा पहिला रुग्ण; काय आहेत लक्षणं आणि कारणं?

पश्चिम आफ्रिकेत कोरोनाप्रमाणेच संसर्गजन्य असणाऱ्या Marburg virus चा पहिला रुग्ण आढळून आला आहे. गेल्या काही दिवसांपासून इबोलाशी लढा देत असलेल्या आफ्रिकेसह आता जगासमोरही नवं संकट उभं ठाकलं आहे.

Marburg virus : पश्चिम आफ्रिकेतील गिनीमध्ये प्रशासनानं जीवघेण्या मारबर्ग व्हायरस (Marburg virus)चा प्रादुर्भाव झाल्याची घोषणा केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम आफ्रिकेत मरबर्ग व्हायरसची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. आफ्रिकेतील इबोला या जीवघेण्या व्हायरसचा प्रादुर्भाव काही दिवसांपूर्वीच कमी झाला होता. त्यानंतर जवळपास दीड महिन्यांतच एका व्यक्तीला संसर्गजन्य ताप आल्याचं पाहायला मिळालं होतं. दक्षिण गिनीच्या गुआकेडो प्रांतात या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाप्रमाणेच वेगानं पसरतो Marburg virus

सध्या जग कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरशी लढतोय. अशातच आता कोरोनाप्रमाणेच वेगानं पसरणाऱ्या Marburg virus चा पहिला रुग्ण आफ्रिकेत आढळून आला आहे. मारबर्ग व्हायरस (Marburg virus) हा संसर्गजन्य विषाणू आहे. आफ्रिकेतील डब्ल्यूएचओ (WHO) चे क्षेत्रीय निर्देशक, मात्शिदिसो मोएती यांनी बोलताना सांगितलं की, हा व्हायरस अत्यंत घातक असून संसर्गजन्य आहे. त्यामुळे याला लवकरात लवकर थोपवणं गरजेचं आहे. सेनेगलची राजधानी डाकारमधील पाश्चर इन्स्टिट्यूटने साईटवरील प्राथमिक तपासणीची पुष्टी केली आहे. सध्या मारबर्ग व्हायरसची लागण झालेल्या रुग्णाचा शोध सुरु आहे. 

डब्ल्यूएचओ (WHO) नं दिलेल्या माहितीनुसार, मारबर्ग व्हायरस वटवाघुळानं खाल्लेली फळं खाल्यानं माणवामध्ये पसरतो. मारबर्ग व्हायरसची लागण झालेल्या बाधित व्यक्तीच्या शरीरातील द्रवांशी थेट संपर्कात आल्यानं याचा संसर्ग होतो. त्यानंतर हा व्हायरस मनुष्यापासून मनुष्यापर्यंत प्रसारित होतो. 

Marburg virusची लक्षणं : 

  • ताप 
  • डोकेदुखी
  • शरीरांतर्गत रक्तस्त्राव

Marburg virusच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी यांसारख्या समस्यांसोबतच शरीरांतर्गत रक्तस्त्राव यांसारख्या लक्षणांचाही समावेश आहे. डब्ल्यूएचओनं दिलेल्या माहितीनुसार, या आजाराचा मृत्यूदर 24 ते 88 टक्क्यांमध्ये आहे. तसेच या व्हायरसविरोधात प्रतिबंधक लस अद्याप उपलब्ध नाही. 

दरम्यान, गेल्या वर्षी गिनीमध्ये इबोला आजाराचा उद्रेक झाला होता, जो डब्ल्यूएचओने जूनच्या मध्यापर्यंत संपवण्याची घोषणा केली होती. गिनीमध्ये इबोला आजारामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा, राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट PM मोदींना धाडले पत्र 
नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा, राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट PM मोदींना धाडले पत्र 
मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
South Movies : 'या' महिन्याच्या शेवटी   6 दाक्षिणात्य चित्रपट आमने-सामने; बॉलिवूडलाही बसणार फटका
'या' महिन्याच्या शेवटी 6 दाक्षिणात्य चित्रपट आमने-सामने; बॉलिवूडलाही बसणार फटका
Ghatkoper Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, भावेश भिंडेसोबतचा फोटो ट्विट
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, भावेश भिंडेसोबतचा फोटो ट्विट
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sunil Tatkare Majha Vision 2024 : मुख्यमंत्री झाल्यानंतरही ठाकरेंना भाजपसोबत जाण्याची इच्छा होतीRam  kadam On Ghatkopar Hording  :  राम कदमांकडून भावेश भिडेंचा ठाकरेसोबतचा फोटो ट्विट : ABP MajhaChanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचे अपडेट्स : 14 मे 2024 : ABP MajhaPM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गंगापुजन, अमित शहा आणि मुख्यमंत्री शिंदे उपस्थित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा, राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट PM मोदींना धाडले पत्र 
नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा, राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट PM मोदींना धाडले पत्र 
मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
South Movies : 'या' महिन्याच्या शेवटी   6 दाक्षिणात्य चित्रपट आमने-सामने; बॉलिवूडलाही बसणार फटका
'या' महिन्याच्या शेवटी 6 दाक्षिणात्य चित्रपट आमने-सामने; बॉलिवूडलाही बसणार फटका
Ghatkoper Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, भावेश भिंडेसोबतचा फोटो ट्विट
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, भावेश भिंडेसोबतचा फोटो ट्विट
Kiran Mane :
"राज ठाकरेंनी मोठी चालबाजी केली"; किरण माने म्हणाले,"थापेबाजी, स्टंटबाजीचा खेळ करू नका"
Nagpur Crime : 'साहेब तुमच्याच मतदारसंघात राहतो, घरच्यांचा मूत्यू झालाय', भाजप आमदाराला भामट्याने गंडवलं
'साहेब तुमच्याच मतदारसंघात राहतो, घरच्यांचा मूत्यू झालाय', भाजप आमदाराला भामट्याने गंडवलं
Premachi Goshta Serial Update : इंद्राचे पुन्हा मुक्तावर दोषारोप; आदित्यमुळे सागर अडकला मोठ्या संकटात!
इंद्राचे पुन्हा मुक्तावर दोषारोप; आदित्यमुळे सागर अडकला मोठ्या संकटात!
मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या मनात भाजपसोबत जाण्याची इच्छा होती , 'माझा व्हिजन'मध्ये सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या मनात भाजपसोबत जाण्याची इच्छा होती , 'माझा व्हिजन'मध्ये सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
Embed widget