एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्वयंचलित कारचा पहिला अपघात, पादचारी महिलेचा मृत्यू
पादचारी महिलेला या स्वयंचलित कारने धडक दिली, मात्र उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.
वॉशिंग्टन : स्वयंचलित कार हे वाहन क्षेत्रातील भवितव्य मानलं जात आहे. मात्र या सेल्फ ड्रिव्हन कारमुळे झालेल्या पहिल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. अमेरिकेतील अॅरिझोनामध्ये हा अपघात घडला.
पादचारी महिलेला या स्वयंचलित कारने धडक दिली, मात्र उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. ही गाडी उबर कंपनीद्वारे चालवली जात होती. संबंधित कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी ही गाडी ऑटोनॉमस (सेल्फ ड्राईव्ह) मोडवर होती. कारमध्ये ड्रायव्हर सीटवर ऑपरेटर बसलेला होता. त्याने गाडीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्नही केला, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता.
स्वयंचलित गाडीने महिलेला उडवल्यानंतर तिला तातडीने रुग्णालायात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिने प्राण गमावले.
या अपघातानंतर उबरने उत्तर अमेरिकेतील सर्व टेस्ट राईड बंद केल्या आहेत. उबरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डारा खॉस्रोवशाही यांनी ट्वीट करत ही "अत्यंत दुःखद बातमी" असल्याचं म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement