एक्स्प्लोर
VIDEO : विमानतळावर मायलेकीला मारहाण, महिला कॉन्स्टेबल निलंबित

इस्लामाबाद : विमानतळावर प्रवासी मायलेकीला बेदम मारहाण करणाऱ्या महिला कॉन्स्टेबलचं निलंबन करण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबादेतील बेनझिर भुत्तो विमानतळावर हा प्रकार घडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने ही कारवाई केली. गझाला शाहीन नावाची महिला कॉन्स्टेबल दोन महिला प्रवाशांना मारहाण करत असल्याचं आणि केसांना धरुन ओढत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. टॉयलेट पेपर गहाळ झाल्यावरुन हा वाद सुरु झाल्याचं म्हटलं जातं. धक्कादायक म्हणजे, हा प्रकार घडताना उपस्थितांनी व्हिडिओ शूटिंग केलं, मात्र सर्वांनीच बघ्याची भूमिका घेणं पसंत केलं. एकाही प्रवाशाने हस्तक्षेप करुन वाद सोडवण्याचा प्रयत्न केला नाही, किंवा मारहाण करण्यापासून रोखलं नाही. गझाला शाहीनवर निलंबनाची कारवाई करुन एफआयएच्या विभागीय कार्यालयात रिपोर्ट करण्यास सांगितलं. तिच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असला, तरी शारीरिक शोषणाबाबत कोणताही उल्लेख त्यात नसल्याची माहिती आहे. पाहा व्हिडिओ :
Before You Go
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















