एक्स्प्लोर
वडिलांच्या मिठीमुळे इमारत कोसळूनही चिमुरडी वाचली
![वडिलांच्या मिठीमुळे इमारत कोसळूनही चिमुरडी वाचली Fathers Last Embrace Saved 3 Year Old Daughter In Building Collapse वडिलांच्या मिठीमुळे इमारत कोसळूनही चिमुरडी वाचली](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/11151038/China-Building-Collapse.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बीजिंग : मृत्यू समोर दिसताना वडिलांनी लेकीला मिठी मारल्यामुळे सुदैवाने तिचे प्राण बचावले आहेत. इमारत कोसळताना मुलीचे प्राण वाचवता वाचवता वडिलांना मात्र जीव गमवावा लागला आहे. चीनमधील बीजिंगमध्ये ही हृदयद्रावक घटना घडल्याचं समोर आलं आहे.
सहामजली इमारत कोसळल्यानंतर त्याच्या ढिगाऱ्याखाली ही चिमुरडी जिवंत सापडली. तब्बल 12 तासांच्या शोधकार्यानंतर तीन वर्षांची चिमुकली सापडली. वडिलांनी आपल्या लेकीला मिठीत गच्च धरुन ठेवल्यामुळे ती वाचली, मात्र शोधकार्य होईपर्यंत वडिलांची प्राणज्योत मालवली होती.
इमारत कोसळून 22 जणांना प्राण गमवावे लागले, तर चिमुरडीसह पाच जण बचावले आहेत. तीन वर्षांच्या वु निन्ग्झीला मात्र किरकोळ जखमा झाल्या आहेत, तर तिच्या आई-वडिलांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला.
घटनेत मृत्युमुखी पडलेले 26 वर्षीय पिता हे एका शू फॅक्टरीमध्ये कार्यरत होते. सिमेंटचा पिलर त्यांच्या अंगावर पडला होता. या दुर्घटनेत वु निन्ग्झीच्या आईचाही मृत्यू झाला. आईचा मृतदेहही वडिलांपासून काही अंतरावरच लिव्हिंग रुममध्ये आढळून आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)