एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दुबईत विमानाचं क्रॅश लॅण्डिंग, प्रवासी थोडक्यात बचावले
दुबई : एमिराट्स एअरलाईनच्या प्रवासी विमानाला दुबईमध्ये अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. या विमानात 275 प्रवासी आणि क्रू-मेंबर होते.
EK521 हे विमान भारतातील तिरुअनंतपुरममधून दुबईला निघालं होतं. पण दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँण्ड होत असताना, स्थानिक वेळेनुसार दुपारी 12.45 वाजता अपघात झाला. यामुळे विमानाचं प्रचंड नुकसान झालं आहे. सुदैवाने सगळे प्रवासी सुखरुप आहे.
अपघातानंतर विमानाला आग लागली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेनंतर काही विमानं माकटॉम आंतरराष्ट्रीय विमानतळ शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळवण्यात आली आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement