एक्स्प्लोर

World's Richest Man : एलॉन मस्क पुन्हा 'नंबर वन', जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी उसळी

Elon Musk World's Richest Man : टेस्लाचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी श्रीमंताच्या यादीत पहिल्या स्थानावर उडी घेतली आहे.

World's Richest Man Elon Musk : टेस्ला (Tesla) आणि ट्विटरचे (Twitter) मालक एलॉन मस्क (Elon Musk) हे पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (World's Richest Man) बनले आहेत. मस्क यांनी जोरदार कमबॅक करत पुन्हा एकदा श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर उसळी घेतली आहे. गेल्या वर्षी मस्क यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. त्यामुळे त्यांचं यादीतील पहिल्या क्रमांकावरील स्थान घसरून ते दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले होते.

यावर्षी एलॉन मस्क यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली असून ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मस्क यांनी लक्झरी ब्रँड लुई व्हिटॉनचे मालक बर्नार्ड ॲरनॉल्ट (Bernard Arnault) यांना मागे टाकलं आहे. ब्लूमबर्ग बिलियनेर्स रिपोर्टनुसार, एलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

श्रीमंतांच्या यादीत एलॉन मस्क पहिल्या क्रमांकावर

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये फ्रान्सचे अब्जाधीश आणि लग्जरी फॅशनच्या दुनियेतील सुप्रसिद्ध ब्रँड लुई व्हिटॉनचे मालक बर्नार्ड ॲरनॉल्टने यांनी मस्क यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला होता. पण मस्क पुन्हा एकदा अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत. 

फोर्ब्स यादीत मस्क दुसऱ्या स्थानावर 

ब्लूमबर्ग बिलियनेर्स रिपोर्टनुसार, एलॉन मस्क श्रीमंतांच्या यादीत 'नंबर वन' ठरले असले तरी, फोर्ब्स यादीत मस्क दुसऱ्या स्थानावर आणि बर्नार्ड ॲरनॉल्ट पहिल्या स्थानावर आहेत. गेल्या वर्षी मस्क यांची संपत्ती 200 अब्ज डॉलरच्या खाली पोहोचली होती.

एलॉन मस्क यांची संपत्ती किती?

ब्लूमबर्ग बिलियनेर्स रिपोर्टनुसार, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांची संपत्ती एकूण 187 अब्ज डॉलर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या बर्नार्ड ॲरनॉल्ट यांची संपत्ती 185 अब्ज डॉलर आहे. या वर्षी मस्क यांच्या एकूण संपत्ती वाढ झाली आहे. जानेवारी महिन्याआधी त्यांच्या संपत्ती 50.1 अब्ज डॉलरची वाढ झाली होती. 

एलॉन मस्क यांना 180 अब्ज डॉलरचं नुकसान

गेल्या वर्षी एलॉन मस्क यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. टेस्लाच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने मस्क यांना 180 अब्ज डॉलरचं नुकसान झालं होतं. याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली. एलॉन मस्क (Elon Musk) एका वर्षात 180 अब्ज डॉलरने गमावणारे पहिले व्यक्ती आहेत. त्यानंतर आता टेस्लाच्या शेअर्समध्ये बाजारात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मस्क यांच्या संपत्तीत वाढ होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Girl Fight Video : एक फुल, दो माली; बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेची दुसरी फेरी 16 एप्रिलला होण्याची शक्यता
Maharashtra Live Blog Updates: अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेची दुसरी फेरी 16 एप्रिलला होण्याची शक्यता
Donald Trump call to Narendra Modi US Iran War: होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेची नाकेबंदी, इराणसोबत वाद चिघळला; ट्रम्प यांनी मोदींना फोन फिरवला; 40 मिनिटांच्या चर्चेत काय काय सांगितलं?
होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेची नाकेबंदी, इराणसोबत वाद चिघळला; ट्रम्प यांनी मोदींना फोन फिरवला; 40 मिनिटांच्या चर्चेत काय काय सांगितलं?
Iran US Conflict : होर्मुझला अमेरिकेचा वेढा, आततायी डोनाल्ड ट्रम्प सगळ्या जगाची कोंडी करणार? आखातात युद्धाची धास्ती वाढली
होर्मुझला अमेरिकेचा वेढा, आततायी डोनाल्ड ट्रम्प सगळ्या जगाची कोंडी करणार? आखातात युद्धाची धास्ती वाढली
Donald Trump : अमेरिका इराण यांच्यातील तणाव कमी होणार? इराणसोबत दोन दिवसात चर्चा शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा दोन दिवसात शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं

व्हिडीओ

Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report
Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar On Ashok Kharat Case: बहिणीची 8 तास चौकशी, आता रुपाली चाकणकर मनातलं सगळं बोलून गेल्या, 28 दिवसांनी काय काय म्हणाल्या?
बहिणीची 8 तास चौकशी, आता रुपाली चाकणकर मनातलं सगळं बोलून गेल्या, 28 दिवसांनी काय काय म्हणाल्या?
CSK Vs KKR : कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
Donald Trump : अमेरिका इराण यांच्यातील तणाव कमी होणार? इराणसोबत दोन दिवसात चर्चा शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा दोन दिवसात शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
Gold Rate : सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
Prasad Oak Manjiri Oak Daughter In Law: प्रसाद ओकची सूनबाई मारवाडी, साखरपुड्यात घडलेला प्रसंग सांगताना मंजिरी ओक म्हणाली...
प्रसाद ओकची सूनबाई मारवाडी, साखरपुड्यात घडलेला प्रसंग सांगताना मंजिरी ओक म्हणाली...
Vaibhav Sooryavanshi : आयपीएलमध्ये दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
Embed widget