मोठी बातमी : रावळपिंडी स्टेडियमबाहेरही धमाका, PSL क्रिकेट सामन्यांवर परिणाम, पाकिस्तानला धक्क्यावर धक्के!
Drone Attack On Rawalpindi Cricket Stadium : रावळपिंडी स्टेडियमबाहेरही धमाका, PSL क्रिकेट सामन्यांवर परिणाम, पाकिस्तानला धक्क्यावर धक्के!

Drone Attack On Rawalpindi Cricket Stadium : पाकिस्तानातील रावळपिंडी स्टेडियमजवळ ड्रोन अटॅक करण्यात आलाय. हा क्रिकेट स्टेडियमजवळ करण्यात आलाय. दरम्यान, आज रात्री या स्टेडियमवर पीसीएलचा सामना खेळवण्यात येणार होता. मात्र, रावळपिंडीमध्ये झालेल्या या ड्रोन अटॅक नंतर आसपासच्या संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
#BREAKING 🇵🇰‼️🇮🇳 An unidentified object fell on close shop in a food street in RAWALPINDI, Pakistan.
— Monitor𝕏 (@MonitorX99800) May 8, 2025
After Geolocating, the location is right next Rawalpindi Cricket Stadium where currently Pakistan Super league matches are held.
Reportedly one person got injured. pic.twitter.com/jzPQNfli4O
पाकिस्तान सुपर लीग रद्द होणार?
रावळपिंडीच्या स्टेडियमवर आज (दि.8) रात्री आठ वाजता कराची किंग्ज आणि पेशावर जाल्मी या दोन संघांमध्ये सामना खेळवला जाणार होता. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या पीएसएल 2025 क्रिकेट स्पर्धेदरम्यान, अनेक खेळाडू ही लीग सोडू इच्छित असल्याच्या बातम्याही येत आहेत. या ड्रोन हल्ल्यानंतर, हा पीएसएल सामना देखील रद्द होऊ शकतो. पण हा सामना रद्द करण्याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये दहशतीचं वातावरण
भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याने एक्स अकाउंटद्वारे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची माहिती दिली. या लष्कराच्या हल्ल्यात अनेक पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले आहेत. भारतीय सैन्याच्या या कारवाईने पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात आला आहे. 22 एप्रिल रोजी काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला ज्यामध्ये भारतातील 26 निष्पाप लोक मारले गेले.
आयपीएलमध्ये आज दिल्ली आणि पंजाब आमने-सामने
पाकिस्तानमध्ये पीएसएल सुरू आहे. त्याच वेळी, भारतात आयपीएल 2025 सुरू आहे. आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेशातील धर्मशाला स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. आजच्या सामन्यापूर्वी, स्टेडियममध्ये गायक बी प्राक यांचे सादरीकरण होईल, ज्याद्वारे बीसीसीआय भारतीय सैन्याला सलामी देईल. दरम्यान आयपीएलमध्ये काल (बुधवारी) 7 मे रोजी चेन्नई आणि कोलकाता यांच्यातील सामन्यात भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ राष्ट्रगीत आणि राष्ट्रगीत गायले गेले होते.
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या























