Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प गुन्हेगारी खटला दाखल होणारे पहिले राष्ट्राध्यक्ष, व्हाईट हाऊसमधीस संवेदनशील कागदपत्रांच्या चोरीचा आरोप
Donald Trump Classified Documents Case: ट्रम्प यांनी शॉवर आणि बॉलरूममध्ये क्लासीफाईड कागदपत्रे (संवेदनशील माहिती असलेली कागदपत्रे) ठेवली होती
Donald Trump Classified Documents Case: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. गोपनीय कागदपत्रांशी लीक केल्याचे आरोप ट्रम्प यांच्यावर आहेत . या प्रकरणी त्यांच्यावर कारवई होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात शेकडो गोपनीय कागदपत्रे आपल्याकडे ठेवल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणांनी ट्रम्प यांच्यावर या प्रकरणांमध्ये आरोप निश्चित केले आहेत.
देशाच्या आण्विक क्षमतेच्या तपशीलांचा समावेश
स्काय न्यूजने दिलेल्या माहितीनुसर, ट्रम्प यांनी शॉवर आणि बॉलरूममध्ये क्लासीफाईड कागदपत्रे (संवेदनशील माहिती असलेली कागदपत्रे) ठेवली होती. ट्रम्प यांच्यावर गोपनीय माहिती बाळगणे, न्यायात अडथळा आणणे आणि खोटी वक्तव्ये करणे असे अनेक आरोप करण्यात आले आहे. आरोपांमध्ये असे म्हटले आहे की, फ्लोरिडामधील त्यांच्या मार-ए-लीगोमध्ये संवेदनशील कागदपत्रांचे बॉक्स हलविण्यात ट्रम्प यांचा सहभाग होता. एपीच्या अहवालानुसार, ट्रम्प यांच्या निवासस्थानातून एफबीआयने जप्त केलेल्या कागदपत्रामध्ये इतर देशांच्या आण्विक क्षमतेच्या तपशीलांचा समावेश आहे.
सीसीटीव्हीमध्ये ट्रम्प आणि त्याचे सहकारी कैद
स्काय न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प आणि त्यांचे सहकारी वॉल्ट नौटा मार-ए-लीगोमधील बॉक्स काढताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले. आरोपांमध्ये दोन परिस्थितींचा उल्लेख आहे ज्यामध्ये ट्रम्प यांनी कथितपणे इतरांना कागदपत्रे दाखवली आणि त्यांच्याकडे अमेरिका तसेच त्यांच्या लष्करी हल्ल्यातील सहयोगींच्या संदर्भात संवेदनशील माहिती असलेली कागदपत्रे आहेत.
एएफपीच्या अहवालानुसार, न्याय विभागाने सांगितले की, ट्रम्प यांनी जानेवारी 2021 मध्ये व्हाईट हाऊस सोडले. तेव्हा ते सोबत पेंटागॉन, सीआयए, राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी आणि इतर गुप्तचर संस्थांकडून अत्यंत संवेदनशील माहिती असलेल्या वर्गीकृत फाइल्स घेऊन गेले होते.
20 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता
फ्लोरिडा येथील फेडरल कोर्टानुसार, ट्रम्प यांनी संवेदनशील माहितीच्या फाईल त्यांच्या फ्लोरिडामधील त्यांच्या मार-ए-लीगो निवासस्थान आणि क्लबमध्ये कागदपत्रे असुरक्षित ठेवल्या. या ठिकाणी नियमितपणे हजारो पाहुण्यांसोबत मोठ्या सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ट्रम्प यांची ही कृती अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणू शकतो. न्याय विभागाचे विशेष वकील जॅक स्मिथ यांनी लावलेल्या प्रत्येक आरोपासाठी ट्रम्प यांनी 20 वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो.
नियमांनुसार, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सर्व ईमेल, कागदपत्रे नॅशनल आर्काइव्हजकडे जमा करावी लागतात. ट्रम्प यांच्यावर अनेक गोपनीय कागदपत्रे नष्ट करण्याचा तर काही आपल्या घरी नेल्याचा आरोप आहे. मात्र ट्रम्प जेव्हा व्हाईट हाऊसमधून बाहेर पडले तेव्हा त्यांनी अनेक कागदपत्रे सोबत घेतल्याचा आरोप आहे. ही कागदपत्रे अनेक मोठ्या बॉक्समध्ये मार-ए-लीगो येथे नेण्यात आली